Nanded Hospital : ‘मुलीचं रक्त जातंय…’, ‘डीन’विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका प्रसुती झालेल्या महिलेचाही समावेश आहे. मृत्यू महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून डीन आणि डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Nanded Hospital Death : नांदेड येथील शंकरराव चव्हाण रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता वाकोडे यांच्यासह दोन जणांविरुद्ध सदोष हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेच्या वडिलांनी अधिष्ठाता वाकोडेंवर गंभीर आरोप केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे वाकोडेंनी शिवीगाळ केल्याचा आरोपही आहे.
ADVERTISEMENT
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात एका मातेचा आणि तिच्या मुलाचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. या प्रकरणात तिचे वडील कामाजी मोहन टोम्पे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवजात बाळ आणि आईचा मृत्यू प्रकरण काय?
कामाजी टोम्पे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मुलगी अंजली वाघमारे हिला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. ३० सप्टेंबर रोजी ८ वाजता भरती करण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी अंजली वाघमारेंने बाळाला जन्म दिला. त्यावेळी आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.
हे वाचलं का?
अंजलीचे रक्त जाण्यास सुरूवात झाली अन्…
टोम्पे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, २ ऑक्टोबर रोजी सकाळी अंजलीला रक्तस्राव होण्यास सुरूवात झाली. बाळाची तब्येतही बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्ताची आणि पेशींची पिशवी बाहेरून आणण्यास सांगितले. आम्ही ते घेऊन आलो. पण, तिथे डॉक्टरच नव्हते. त्यामुळे डीन वाकोडे यांच्याकडे गेलो. त्यांना डॉक्टरांना पाठवण्यास सांगितले.
हेही वाचा >> राष्ट्रपती राजवट: ‘तुमच्याकडे बहुमत होतं तर मला का विचारलं?’, शरद पवारांनी गाठलं फडणवीसांना खिंडीत
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात पवारांनी काढल्या चुका, वाचा 2019 ची Inside Story
हेही वाचा >> अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!
तक्रादाराने केलेल्या आरोपानुसार डीन वाकोडेंनी बसून ठेवले. तक्रारदाराने डॉक्टर पाठवण्याची वारंवार विनंती केल्यानंतर डीनने शिवीगाळ करून हाकलून दिले. मुलीला आणि तिच्या बाळाला भेटू दिले नाही. मुलीवर आणि बाळावर उपचारच केले नाही.
ADVERTISEMENT
बाळ आणि आईचा मृत्यू
तक्रारीत म्हटलं आहे की, २ ऑक्टोबर रोजी अंजलीच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगून सकाळी ६ वाजता बाळ आमच्याकडे सोपवले. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुलगी अंजलीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डीन वाकोडे यांनी उपचारासाठी डॉक्टर पाठवलेले नाही. उपचाराअभावी अंजलींचा आणि इतर रुग्णांचाही मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
नांदेड ग्रामीण पोलिसांनी तक्रारीवरून डीन वाकोडे आणि अंजली आणि बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT