नांदेड शहरानजीक गावात चालत्या दुचाकीसह तरुण जळून खाक, अपघात की घातपात?

मुंबई तक

Nanded News : नांदेड शहरानजीक असलेल्या वाजेगाव येथे एका पुलावरून तरुण आपल्या दुचाकीसह जळून खाक झाला. भीषण आग लागल्यानंतर उसळल्यानंतर दुचाकी आणि त्या तरुणाच्या शरीरातून अनेक स्फोटकांचे आवाज ऐकू लागले.

ADVERTISEMENT

Nanded News
Nanded News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुलावरून तरुण आपल्या दुचाकीसह जळून खाक

point

हा घातपात तर नाही ना?

Nanded Crime : कुवरचंद मंडले - नांदेड शहरानजीक असलेल्या वाजेगाव येथे एका पुलावरून तरुण आपल्या दुचाकीसह जळून खाक झाला. भीषण आग उसळल्यानंतर दुचाकी आणि त्या तरुणाच्या शरीरातून अनेक स्फोटकांचे आवाज ऐकू लागले. ईदगाहजवळील गोदावरील बंधारावर घडलेल्या या घटनेनं जनतेत भलतेच तर्कवितर्क लावले जात आहेत. दुचाकीसह जळून खाक झालेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेहाची देखील ओळख पडली असून एक पथक रवाना करण्यात आले.  

हे ही वाचा : बंदुकीचा धाक दाखवून महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, आधी लग्नाचे दिले आमिष... लाज आणणारी घटना

संबंधित घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुराव यांनी सांगितले होते. घटनास्थळावरील सखोल तपास सुरु असल्याचे अप्पर पोलीस सुरज गुरव यांनी सांगितले. घटनास्थळी काही वस्तू आढळले असून ते जप्त करण्यात आले. दरम्यान, मयत व्यक्तीची ओळख पटली आहे. या घटनेचा सर्व तपास सुरु असून प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक पातळीवर तपास सुरु आहे. 

हे ही वाचा : धाराशिवमध्ये लोककलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रांवर घडला प्रकार; 'असं' बाहेर आलं प्रकरण

हा घातपात तर नाही ना?

या तपासातून लवकरच निष्कर्ष समोर येईल, असं सूरज गुरव यांचं म्हणणे आहे. हा घातपात तर नाही ना? या मागील नेमका हेतू काय आहे, याचा तपास सुरु आहे. सद्या त्या व्यक्तीची प्राथमिक माहिती आहे. त्यावरून तपास सुरु आहे. घटनास्थळी मिळालेले साहित्य आणि प्रत्यक्षदर्शनीचे जबाब यातून काही निष्कर्ष निघाले आहे. त्या अनुषंगाने तपास असलेल्या पोलिसांनी सांगितले.  

हे वाचलं का?

    follow whatsapp