Narak chaturdashi katha : नरक चतुर्दशीच्या पौराणिक कथा! दिवाळीआधीच का होते साजरी?
Narak chaturdashi 2024 : दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणात धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नरक चतुर्थी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नरक चतुर्दशी कधी आहे?

नरक चतुर्दशीच्या 3 पौराणिक कथा
Narak chaturdashi Katha in Marathi : दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणात धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नरक चतुर्थी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. हा सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो, याला छोटी दिवाळी सोबत रुप चौदस आणि काली चतुर्दशी असेही म्हणतात. पण यामगची पौराणिक कथा तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया. (Narak chaturdashi Mythology katha 2024 why is it celebrated before Diwali know it in detail)
नरक चतुर्दशी कधी आहे?
पंचांगानुसार, या वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:15 वाजता सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 03:52 वाजता संपेल. नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाईल.
हेही वाचा : Maharashtra Weather : महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार? वाचा IMD चा अंदाज | Shiv Sena UBT|
नरक चतुर्दशीच्या 3 पौराणिक कथा
पहिली कथा : नरकासुराला भौमासुर असेही म्हणतात. कृष्ण आपल्या आठ पत्नीसह द्वारकेत सुखाने राहत होता. एके दिवशी स्वर्गाचा राजा इंद्र आला आणि त्याने त्याला प्रार्थना केली, 'हे कृष्णा! प्राग्ज्योतिषपूरचा राक्षस राजा भौमासुराच्या अत्याचारामुळे देवतागण संकटात सापडले आहेत. क्रूर भौमासुराने वरुणचे छत्र, अदितीचे कुंडल आणि देवांची रत्ने हिसकावून घेतली आणि तो त्रिलोक विजयी झाला. इंद्र म्हणाला, 'भौमासुराने पृथ्वीवरील अनेक राजांच्या आणि सामान्य लोकांच्या सुंदर मुलींचे अपहरण करून त्यांना आपल्या घरात कैदेत ठेवले आहे. प्रभू आम्हाला वाचवा.
इंद्राची प्रार्थना स्वीकारून श्रीकृष्ण आपल्या प्रिय पत्नी सत्यभामासह गरुडावर स्वार होऊन प्राग्ज्योतिषपूरला पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामेच्या साहाय्याने प्रथम ताम्र, अंतरीक्षा, श्रवण, विभावसु, नभश्वन आणि अरुण या सहा पुत्रांसह मुर राक्षसाचा वध केला.