Shiv Sena UBT: 'हेच निष्ठेचं फळ?', ठाकरेंना मोठा धक्का.. कट्टर शिवसेना नेत्याचा थेट राजीनामा!
Shiv Sena UBT Sadanand Tharwal: "संघर्ष काळातील एकनिष्ठ दुर्लक्षित राहणार असेल तर एकनिष्ठेचे फळ काय ?" असं म्हणत शिवसेना UBT पक्षाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पहिली यादी जाहीर होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर होताच नाराजी नाट्य

सदानंद थरवळ यांनी दिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने थरवळ नाराज
Shiv Sena UBT 1st Candidate list Sadanand Tharwal resigned: डोंबिवली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही दिवसांपूर्वीच पक्षात दाखल झालेल्या दिपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यावरून नाराज झालेल्या जुन्या शिवसैनिक आणि विद्यमान जिल्हाप्रमुखाने एका पत्राद्वारे थेट उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागत आमच्या एकनिष्ठतेचे हेच का फळ? असा सवाल उपस्थित करत आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना (UBT) पक्षाकडून पहिली 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली. ज्यामध्ये डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यावरून जुने शिवसैनिक अशी ओळख असलेल्या आणि पक्षामध्ये सध्या कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख असे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या सदानंद थरवळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर एका पत्राद्वारे त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे.
हे ही वाचा >>Shivadi Vidhan Sabha : शिवडीच्या जागेचा मुद्दा शिगेला? अजय चौधरी की सुधीर साळवी? 'या' नेत्याचं पारडं जड
'आपल्यावर, आदित्य साहेबांवर अगदी खालच्या पातळीत बोलणारा पूर्वाश्रमीचा शिवसैनिक पक्षात परत आल्यावर त्याला लगेचच डोंबिवलीतून उमेदवारी मिळणार असेल आणि संघर्ष काळामध्ये सदैव एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक दुर्लक्षितच राहणार असेल तर साहेब, या निष्ठेचे फळ काय?' असा खडा सवाल सदानंद थरवळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपण अत्यंत कठोर मनाने जिल्हाप्रमुख पद तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगत भविष्यात आमच्या निष्ठा आणि इमानावर हसतील अशा शब्दांत थरवळ यांनी आपली कैफियत मांडली आहे.
सदानंद थरवळ यांचे पत्र जसेच्या तसे...
प्रति, श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!!!