Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार? वाचा IMD चा अंदाज

रोहिणी ठोंबरे

Maharashtra Weather Today : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर सुरूच आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर सुरूच आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतानाही पाऊस जायचं काही नावच घेत नाही. आणखी किती दिवस हा परतीचा पाऊस सुरू राहणार आज (24 ऑक्टोबर 2024) जाणून घेऊया.(maharashtra weather forecast update Today 24 october rain IMD alert to these districts IMD report mumbai pune kokan)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाने जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवली होती. तर जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार,  आजपासून म्हणजेच गुरूवार, 24 ऑक्टोबरपासून धूके येईल आणि त्यानंतर थंडीची चाहूल जाणवणार आहे.

हवामान विभागाचा आज 'या' जिल्ह्यांना इशारा!

मुंबईत आज काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळू शकतो. मुंबईत आता उकाडा जाणवायला सुरूवात होणार आहे. तर, संध्याकाळी काही भागात पाऊस हजेरी लावेल. मुंबईचं कमाल तापमान आज 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.

पुण्यात पावसाचा जोर ओसरला. आता जिल्हा आणि परिसरात हवामान कोरडे असण्याची शक्यता आहे. तर, अधूनमधून ढगाळ वातावरण असेल. घाट भागात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात आज 29 अंश सेल्सिअस कमाल आणि 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याचा अंदाज आहे.

विदर्भातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहू शकतात. नागपूरचं कमाल तापमान आज 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा... Shiv Sena UBTMukhymantri Majhi Ladki Bahin Yojana|

हे वाचलं का?

    follow whatsapp