नाशिक : काळाराम मंदिरात संयोगिता राजेंसोबत घडला धक्कादायक प्रकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kalaram temple mahants stopped Chhatrapati Sambhaji raje's wife sanyogita raje from chanting Vedokta mantras
Kalaram temple mahants stopped Chhatrapati Sambhaji raje's wife sanyogita raje from chanting Vedokta mantras
social share
google news

नाशिकच्या काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबद्दल स्वतः संयोगिता राजे यांनी पोस्ट लिहून माहिती घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. या प्रकरणावर आता काळाराम मंदिर ट्रस्टनेही त्यांची भूमिका मांडली आहे. (Nashik’s Kalaram temple mahants stopped Chhatrapati Sambhaji raje’s wife sanyogita raje from chanting Vedokta mantras)

ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे या नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी तेथील पुजाऱ्यांनी पुजा करताना पुराणातील मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे संयोगिता राजेंनी या पुजाऱ्यांना सुनावलं. त्यांनी मंदिरात घडलेल्या प्रकाराबद्दल पोस्टही लिहिली आहेत.

काळाराम मंदिर : संयोजिता राजे यांचा नेमका आरोप काय?

संयोजिता राजे सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, “नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणं देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला.”

हे वाचलं का?

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका; उच्च न्यायालयाने आमदार निधीचे वाटप रोखले

“शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हटली,” असं संयोगिताराजेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “आपण सर्वजण देवाची लेकरे आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी क्रांतिकारक निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यामुळे आत्मबल प्राप्त झाले. त्यामुळे महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत पणे करू शकले,” असं संयोगिताराजेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काळाराम मंदिर ट्रस्टने झालेल्या प्रकाराबद्दल काय भूमिका मांडली?

यावर काळाराम मंदिर ट्रस्टने दिलगिरी व्यक्त केली आहे. काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर म्हणाले, “आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही. याआधी 11 फेब्रुवारीला संभाजी राजे सहकुटुंब दर्शनाला आले होते. ते दर्शन घेऊन परत गेले. सहसा महत्त्वाच्या व्यक्ती दर्शनाला येतात, तेव्हा विश्वस्तांना आधीच कल्पना असते. आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण, यावेळी संयोगिता राजे आल्या, त्याबद्दल विश्वस्तांना कोणतीही कल्पना नव्हती. झालेला प्रकार सोशल मीडियावर समाजला. आम्ही चौकशी करू पण, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.”

जितेंद्र आव्हाडांची काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांवर टीका

जितेंद्र आव्हाडांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. “काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्यांना सुनावलं. छत्रपतींमुळे मंदिरं राहिली, त्यांनाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही? त्यांनीं उत्तरं दिले नाही, तुम्हाला अधिकार नाही. छत्रपतीं शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली.”

Video – अजित पवार यांनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल, सगळे हसून हसून लोटपोट

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणतात, “शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बरं झाले हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झाले, जे मी सांगतो तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे, हे दाखवून देतात. अजुन कुठला पुरावा हवा. आज छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते, तर बाकीच्यांच काय? बहुजनांनो डोळे उघडा, हाच तो सनातन धर्म; तो तुम्हाला शुद्रच मानतो.”

“ह्याच काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले होते. काही सनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते, असे सनातनी धर्म परिषदेत फशारक्या मरतात”, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT