“तुमचा दाभोळकर करू”, शरद पवारांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp chief sharad pawar death threats tweet Supriya Sule mumbai police commissioner filed a complaint home minister devendra fadnavis
ncp chief sharad pawar death threats tweet Supriya Sule mumbai police commissioner filed a complaint home minister devendra fadnavis
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar) ट्विटरवरुन (Twitter) जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धमकीनंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘पवारांना काही झालं तर गृहखातं जबाबदार असेल.’ असा इशारही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. ncp chief sharad pawar death threats tweet Supriya Sule mumbai police commissioner filed a complaint home minister devendra fadnavis

शरद पवारांना ट्विटरवरुन धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. दोन ट्विटर हॅडलवरुन ही धमकी देण्यात आल्याचं समोर आली आहे. त्यानंतर सकाळीच सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या शिष्टमडंळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे..

‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशा प्रकारची धमकी एका पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे BJP अॅक्टिव्हिस्ट असा बायो असलेल्या सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या

माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ट्विटरवरुन हा मेसेज आला आहे. कोणत्या तरी वेबसाइटवरुन धमकी दिली जात आहे. तसंच त्यांचे जे फॉलोवर्स आहेत या बाबतीतल अशा कमेंट आल्या आहेत. ज्या अतिशय आक्षेपार्ह आहेत. या प्रकरणी गृह विभागाने तातडीने त्याची नोंद घ्यावी. मी आज मुंबईच्या सीपीपर्यंत हे पोहचवलं आहे. पवार साहेबांबाबत जी धमकी ज्या पद्धतीने आली आहे ते दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरूर असतात. पण आता जेवढा द्वेष ज्या पद्धतीने पसरवला जात आहे समाजात. ते खूपच दुर्दैवी आहे.’

‘मी आजच एक बातमी पाहिली… एक मुलगा सोलापूरमध्ये दोन मुलींसोबत कॉफी पित होता. तिथे त्याचे प्रोफेसरही होते. कॉफी पित असताना काही मुलं तिथे आली आणि त्यांनी त्या मुलाला भयंकर मारलं. ही कुठली दडपशाही आहे, गुंडाराज आहे. जर सोलापूर सारख्या ठिकाणी मुलीसोबत साधी कॉफी पिऊ शकत नसेल तर हे पूर्णपणे प्रशासनाचं अपयश आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mira Road Murder: ‘मी HIV पॉझिटिव्ह, सरस्वतीसोबत कधीही लैंगिक संबंध..’ मनोज सानेचा दावा

‘म्हणजे तुम्ही एखाद्या मुलाला काय म्हणून मारलं.. मी वाचलं की पोलिसांनी कारवाई केली. पण हिंमतच कशी होते अशी एखाद्या मुलाला मारायला. ही कुठली संस्कृती आहे.’

ADVERTISEMENT

‘त्यानंतर आज ही आलेली धमकी.. त्यानंतर केलेल्या कमेंट.. एवढा द्वेष कुठून पसरवलं जात आहे. यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी माझी मागणी आहे सरकारकडे. या धमकीचा पाठपुरावा करणार. याबाबत जो काही न्याय आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. मी एक महिला आणि नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागते आहे. तुम्ही मला न्याय द्यावा या अपेक्षेने मी आली आहे. जर काही झालं तर त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील.’

हे ही वाचा >> Shiv Sena (UBT): ‘…त्याशिवाय भाजप-मिंधे सरकारच्या मुडद्यात जान येणार नाही’, पुन्हा जहरी टीका

‘कारण जे सरकार असतं त्यांची जबाबदारी असते. आम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलो आहोत. बंटी पाटील स्वत: दोन महिन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलले होते. मग बंटी पाटलांना कळतं तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कळत नाही? सोयीप्रमाणे यांचं इंटेलिजन्स फेल्युअर होतं हे दिसतंय.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

नितेश राणेंनी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटनंतर राष्ट्रवादीचं जोरदार आंदोलन

दरम्यान नितेश राणे यांनी शरद पवरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्विटच्या विरोधात मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीकडून जेलभरो आंदोलन देखील करण्यात
येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT