Viral Video : वृद्धेचा व्हिडीओ पाहुन अर्थमंत्र्यांनी SBI ला झापलं, म्हणाल्या, “मानवतेनं वागा”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Surya Harijan, a resident of Jharigaon in Nabarangpur district, was seen walking barefoot in the scorching heat with the support of a broken chair to reach a bank to collect her pension momye from SBI
Surya Harijan, a resident of Jharigaon in Nabarangpur district, was seen walking barefoot in the scorching heat with the support of a broken chair to reach a bank to collect her pension momye from SBI
social share
google news

ओडिसामधील एका वृद्ध महिलेचा रणरणत्या उन्हात विना चप्पल तुटक्या खुर्चीच्या आधारे चालतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातून हा ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. सूर्या हरिजन (70) ही वृद्ध महिला आपली पेन्शन घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जातानाचा हा व्हिडीओ आहे. मात्र या वृद्ध महिलेची अवस्था पाहून तिला चालताना भयंकर त्रास होतं असल्याचं दिसून येत आहे. (Surya Harijan, a resident of Jharigaon in Nabarangpur district, was seen walking barefoot in the scorching heat with the support of a broken chair to reach a bank to collect her pension momye from SBI)

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला फैलावर घेतलं आहे. सीतारमण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. त्या म्हणाल्या की, वित्तीय सेवा विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने अशा प्रकरणांची त्वरित दखल घेऊन मानवतेने वागावे अशी अपेक्षा आहे. तेथे बँक मित्र नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मैत्रिणीच्या नवऱ्याचं ‘गुपित’ समजलं, अन् तरुणीने पाहा काय केलं…

यावर स्टेट बँकेकडूनही सकारात्मक उत्तर देण्यात आले आहे. स्टेट बँकेने ट्विट करत म्हटले की, व्हिडिओ पाहून आम्हालाही खूप वाईट वाटले. श्रीमती सूर्या हरिजन त्यांच्या गावात असलेल्या सीएसपी पॉईंटवरून दर महिन्याला त्यांचे वृद्धापकाळ पेन्शन काढत होत्या. पण वृद्धत्वामुळे सीएसपी पॉईंटवर त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नव्हते. ती तिच्या नातेवाईकासोबत आमच्या झारीगाव शाखेत गेल्याचे एसबीआय बँकेकडून सांगण्यात आले. ही रक्कम आमच्या शाखा व्यवस्थापकाने त्यांच्या खात्यात मॅन्युअल डेबिट करून त्वरित हाती दिली आहे. पण आता पुढील महिन्यापासून पेन्शन त्यांच्या घरपोच दिली जाईल. एवढेच नाही तर श्री सूर्य हरिजन यांना व्हील चेअर देण्याचा निर्णयही घेतला आहे, असे स्टेट बँकेने सांगितले.

ADVERTISEMENT

त्याचं झालं असं की, एएनआय या वृत्तसंस्थेने 70 वर्षीय महिलेचा पेन्शन काढण्यासाठी रणरणत्या उन्हात विना चप्पल तुटक्या खुर्चीच्या आधारे चालतानाचा एक ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ ट्विट केला होता. ट्विट करत म्हटलं होतं की, वृद्ध महिलेचे नाव सूर्या हरिजन आहे आणि त्या पेन्शनसाठी बँकेत जात आहेत. त्या ओडियाच्या नबरंगपूर जिल्ह्यातील झारीगनमधील बानुगुडा गावातील रहिवासी आहेत.

ADVERTISEMENT

Twitter Blue Tick Price : तुमचीही Twitter वरील Blue Tick गेली? अशी आहे प्रक्रिया

सुर्या हरिजन पेन्शन काढण्यासाठी सूर्या 17 एप्रिल रोजी एसबीआय बँकेत गेल्या होत्या. पण, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा खात्याशी जुळत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. पण आम्ही त्यांची ही समस्या लवकरच सोडवू असे बँकेच्या मॅनेजरनी स्पष्ट केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 4 महिन्यांपासून वृद्ध महिलेला पेन्शन मिळाले नसल्याची माहिती आहे. वृद्ध महिला सूर्या हरिजन यांना दोन मुले आहेत. एक मुलगा दुसऱ्या राज्यात मजूर म्हणून काम करतो. तर तिथेच धाकटा मुलगा कुटुंबासह राहत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक बँक कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT