दिव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेत एकाचा मृत्यू

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Eknath Shinde one person died electric shock chief minister public meeting diva kalyan shirkant shinde
Eknath Shinde one person died electric shock chief minister public meeting diva kalyan shirkant shinde
social share
google news

CM Eknath Shinde Public Meeting: दिवा: विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या दिव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जाहीर सभेला स्थानिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी एका 55 वर्षीय रामजीयावन विश्वकर्मा यांचा घटनास्थळी खुल्या विद्युत तारेचा झटका (Electric Shock) लागून मृत्यू (Death) झाला. (one person died electric shock chief minister public meeting diva kalyan shirkant shinde)

नेमकी घटना काय?

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भाषण सुरू होताच मंचाच्या डावीकडे पदपथावर उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यांनी भाषण थांबवून उपस्थित नागरिकांना काय घडले? असे विचारले.

त्यावेळी त्या ठिकाणी विजेच्या शॉक लागून एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याचे त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी त्याला तात्काळ रुग्णालयात पाठवण्यास सांगून तेथील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. रामजीयावन विश्वकर्मा असे या विद्युत तारेचा झटका लागलेल्या व्यक्तीचे नाव होते. त्याला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी दुर्दैवी मृत्यू झालेल्या विश्वकर्मा यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व दिवा आगासन हा मुख्य रस्ता बंद करून त्या ठिकाणी सभा घेऊन निष्काळजीपणा करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान खारघरमधील दुर्घटनेत 14 जणांनी गमावलेले जीव

राज्य सरकारने 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलं होतं. ज्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या सोहळ्यात ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी लाखो लोक हे जमले होते. मात्र, त्यापैकी 14 श्रीसदस्यांचा रणरणत्या उन्हात उष्माघाताने मृत्यू झाला होता. तर 24 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 25 जणांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठविण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृत कुटुंबीयांना सरकारच्यावतीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच सर्व उपचार घेणाऱ्या श्रीसदस्यांचा मोफत इलाज करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या होत्या.

नवी मुंबईजवळील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 25 लाख श्रीसदस्यांनी उपस्थिती लावली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT