अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्राच्या ‘या’ वकिलाची धाव, कायदेशीर लढा देणार!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

parliament security breach advocate asim sarode fight for amol shinde in court new delhi
parliament security breach advocate asim sarode fight for amol shinde in court new delhi
social share
google news

Parliament Security Breach, Amol Shinde : संसदेत बुधवारी चार तरूणांनी घुसखोरी करून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यामुळे लोकसभेत आणि संसदेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी आता सहा जणांना अटक झाली आहे. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसीच्या कलम 452 (अतिक्रमण) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) व्यतिरिक्त यूएपीएच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हा दाखल झालेल्या सहा तरूणांपैकी दोघे जण हे महाराष्ट्राचे आहेत. यातील अमोल शिंदे यांच्या मदतीला वकील असीम सरोद यांनी धाव घेतली आहे. आणि कायदेशीर लढा देणार असल्याची माहिती दिली आहे. (parliament security breach advocate asim sarode fight for amol shinde in court new delhi)

असीम सरोद यांनी त्याच्या फेसबूकवर एक भली मोठी पोस्ट लिहली आहे.या पोस्टमध्ये असील सरोदे यांनी संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेसाठी कायदेशीर लढा देण्याची माहिती दिली आहे. नेमकं त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलं आहेत ते जाणून घेऊयात.

हे ही वाचा : भावाच्या प्रेयसीला दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून, सगळी घटना सीसीटीव्हीत कैद

असीम सरोदे यांची पोस्ट जशीच्या तशी

अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल.
अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते.त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे.त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘…तर माझ्या मुलाला फाशी द्या’, मनोरंजनाच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले

नेमकी घटना काय?

खरं तर संसदेत चार जणांनी घुसखोरी केली होती. यामधील नीलम (42) आणि अमोल शिंदे (25) या दोघांनी संसदेच्या बाहेरील परीसरात गोंधळ घातला होता. त्याच दरम्यान इतर दोघे म्हणजेच सागर शर्मा आणि मनोरंजन या दोघांनी थेट लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरी गाठली होती. या प्रेक्षक गॅलरीतून नंतर त्यांनी सभागृहातील खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या होत्या. यातील एका तरूणाने बाकावर उड्या मारल्यानंतर बुटातून स्प्रे काढून सभागृहात फवारला होता. त्यानंतर खासदारांनी मिळून त्याला ताब्यात घेतले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT