Chandrayaan-3 ‘तुमचे नाव सोमनाथ म्हणजे चंद्राशी..’ पंतप्रधान मोदींचा इस्रो प्रमुखांना फोन, नेमकं काय म्हणाले?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

pm modi phone call to isro chief s somnath on the successful landing of Chandrayaan-3 said 'Your name Somnath is also associated with the moon
pm modi phone call to isro chief s somnath on the successful landing of Chandrayaan-3 said 'Your name Somnath is also associated with the moon
social share
google news

ISRO S. Somnath: बंगळुरू: चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ (S Somnath) आणि संपूर्ण टीमला वैयक्तिक शुभेच्छा देण्यासाठी थेट द. आफ्रिकेवरून फोन केला होता. यावेळी मोदींनी म्हटलं की, ते लवकरच बंगळुरूला भेट देणार आहेत. जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेला (BRICS Summit)उपस्थित असलेले पंतप्रधान फोनवर म्हणाले, ‘सोमनाथ जी… तुमचे नाव सोमनाथ म्हणजेच चंद्राशीही जोडलेले आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही आनंद झाला असेल. तुमचे आणि तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन.’ (pm modi phone call to isro chief s somnath on the successful landing of Chandrayaan-3 said ‘Your name Somnath is also associated with the moon)

पाहा पंतप्रधान मोदी फोनवरून नेमकं काय म्हणाले

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगनंतर लगेचच पंतप्रधानांनी इस्रो प्रमुखांना फोन केला. ते म्हणाले, ‘कृपया माझ्या शुभेच्छा सर्वांना कळवा. शक्य असल्यास, मी लवकरच तुम्हाला वैयक्तिकरित्या शुभेच्छा देईन.’

दुसरीकडे, इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी बुधवारी सांगितले की, ‘चांद्रयान-3 चे यश हे इस्रोचे नेतृत्व आणि शास्त्रज्ञांच्या पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. हे यश ‘प्रचंड’ आणि ‘उत्साह’ वाढवणारं आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Exclusive: Chandrayaan-3 Vikram लँडरने नुकतेच पाठवले चंद्राचे नवे फोटो!

मिशन ऑपरेशन सेंटर येथे इस्रो टीमला संबोधित करताना सोमनाथ म्हणाले, “माननीय पंतप्रधानांनी मला फोन केला आणि तुम्ही इस्रोमध्ये केलेल्या अद्भूत कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. चांद्रयान-3 मिशनमध्ये त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आणि इतर सगळेच जण त्यांचे आभार मानतो. आपण राष्ट्रासाठी करत असलेल्या प्रेरणादायी कार्याला पुढे नेल्याबद्दल कौतुक होत आहे.’

अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचत इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ घेऊन जाणाऱ्या लँडर मॉड्यूलचे यशस्वीरित्या सॉफ्ट-लँडिंग केले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला.

ADVERTISEMENT

यासह, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करणारा भारत हा जगातील पहिला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करणारा जगातील चौथा देश ठरला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT