फडणवीसांसमोर राम शिंदे-राधाकृष्ण विखे पाटलांमधील मतभेद चव्हाट्यावर, काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

politics of maharashtra in marathi : cold war between ram shinde and Radhakrishna vikhe patil.
politics of maharashtra in marathi : cold war between ram shinde and Radhakrishna vikhe patil.
social share
google news

Ahmednagar Politics : व्हिडीओत दिसणारी दृश्यं आहेत, अहमदनगरची. नगरच्या राजकारणातली भाजपची मातब्बर नेतेमंडळी देवेंद्र फडणवीसांसोबत दिसत आहेत. पण या दृश्यांमध्ये भाजपमधले टोकाचे मतभेदही चव्हाट्यावर आलेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यक्रमात आमदार राम शिंदेंसाठी खुर्चीच नाही. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात आल्यावर शिंदे आल्या पावली माघारी निघाले. चाणाक्ष नजर असलेल्या फडणवीसांना हीच गोष्ट लक्षात आली. आणि त्यांनी सुत्रं फिरवली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

ADVERTISEMENT

राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे या भाजपमधल्याच दोन मातब्बरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू झाल्यात. राम शिंदे हे भाजपचे अहमदनगरमधले जुनेजाणते नेते आहेत, तर काँग्रेसमधून आलेल्या विखे पाटलांचं भाजपमधील कार्यकाळ अवघा साडेतीन वर्षांचा आहे. पण आता याच नव्या-जुन्या नेत्यांमधला वाद शिगेला पोहोचलाय.

हेही वाचा >> ‘महिलेसोबत नको त्या अवस्थेत…’, गिरीश महाजनांवर टीका करताना एकनाथ खडसे काय बोलले?

कर्जत-जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत विखे पाटलांनी राष्ट्रवादीच्या रोहित पवारांना मदत केल्याचा आरोप शिंदेंनी केला. फडणवीसांच्या जवळचे मानले जाणाऱ्या शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून चर्चेत राहत असलेल्या विखे पाटलांवरच हल्ला चढवला.

हे वाचलं का?

अहमदनगरमध्ये फडणवीसांसमोर काय घडलं?

याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 26 मे रोजी नगरमध्ये एक मोठी घडामोड घडली. भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर दौऱ्यावर होते. वेगवेगळ्या शासकीय कार्यक्रमांना फडणवीसांनी हजेरी लावली. यानिमित्ताने अनेक दिवसांनंतर विखे पाटील आणि राम शिंदे कॅमेऱ्याच्या एकाच फ्रेममध्ये कैद झाले.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंना सल्ला, एकनाथ शिंदेंना ऑफर; आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

पण, जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत भाजपमधला बेबनाव चव्हाट्यावर आला. फडणवीसांच्या नेतृत्वातील या बैठकीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्यासोबतच शिवाजीराव कर्डीले यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था होती. पण शिंदेंसाठी स्वतंत्र खुर्चीच नव्हती. प्रोटोकॉलनुसार विधान परिषद सदस्य असलेल्या राम शिंदेंसाठी खुर्ची असायला हवी होती. हीच गोष्ट ध्यानात आल्यावर राम शिंदे आल्या पावली माघारी फिरले.

ADVERTISEMENT

फडणवीसांमुळे शिंदेंना मिळाली खुर्ची

चौफेर नजर असलेल्या फडणवीसांना मात्र लगेच ही गोष्ट ध्यानात आली. आणि त्यांनी राम शिंदेंना बोलवून घेत. स्वतःच्या बाजूला जागा करून दिली. आणि या सगळ्या मानापमान नाट्यावर कॅमेऱ्यादेखत पडदा पडला. पण फडणवीसांसमोर विखे पाटील आणि शिंदे यांच्यातला बेबनावही चव्हाट्यावर आला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT