एंट्रीवरून वाद, भाऊचा EGO झाला हर्ट अन् पबलाच लावून टाकली आग

योगेश पांडे

नागपुरातील शिवाजीनगर येथील द बॅरेल कॅफेमध्ये एंट्री आणि सर्व्हिसवरून वाद झाल्यानंतर आग लावल्याचा आरोप. अंबाझरी पोलिसांनी दोन शेफना अटक केली असून, सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

नागपूरः पबमध्ये प्रवेश आणि सर्व्हिसवरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने पेट्रोल टाकून कॅफेला आग लावल्याची घटना नागपुरात समोर आली आहे. शिवाजीनगर येथील द बॅरेल कॅफेमध्ये घडलेल्या या आगीमुळे सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, 5 सप्टेंबरच्या रात्री मनमोहन उर्फ निखिल बुद्धसागर तिवारी हा कॅफेमध्ये गेला होता. प्रवेशाच्या वेळी त्याच्याकडे असलेल्या काही संशयास्पद वस्तू आत नेण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर प्रवेशासाठी त्याच्याकडून काही पैसे जमा करून घेण्यात आले आणि त्याला कॅफेमध्ये प्रवेश देण्यात आला.

कॅफेमध्ये त्याने मद्य खरेदी केले. मात्र, ते बनावट असल्याचा संशय आल्याने आणि पैसे देऊनही अपेक्षित सर्व्हिस मिळाली नसल्याने तो नाराज झाला. या नाराजीतून तो कॅफेबाहेर पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.