Rashmi Shukla : मोठी बातमी! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

rashmi shukla will be appointed as the dgp of maharashtra rajnish sheth
rashmi shukla will be appointed as the dgp of maharashtra rajnish sheth
social share
google news

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish sheth) यांची एमपीएससीच्या (MPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिला महिला महासंचालक ठरण्याची शक्यता आहे. (rashmi shukla will be appointed as the dgp of maharashtra rajnish sheth)

ADVERTISEMENT

सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी व्हिआरएस घेतली आहे.आता रजनीश शेठ एमपीएससीचे (MPSC) अध्यक्ष असणार आहेत. तर त्यांच्या जागी फोन टॅपिंगचा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक असण्याची शक्यता आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना रश्मी शुक्ला या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. यावेळी राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करून देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण नंतर कोर्टात पुढे कोर्टात गेले होते.

हे वाचलं का?

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नाना पटोले यांनी ट्वीट करून सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करून त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर खटला चालवून शिक्षा देण्याऐवजी, येड्यांच्या सरकारने त्यांच्याविरोधातील खटले बंद करून त्यांना पोलीस महासंचालक बनवले असल्याची टीका नाना पटोले यांनी महायुतीवर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता खुले आम फोन टॅपिंग आणि विरोधकांवर पाळत ठेवण्याचे लायसन्स महायुती सरकारने रश्मी शुक्लांना दिल्याचाही टोला नाना पटोले यांनी सरकारला लगावला.

ADVERTISEMENT

दरम्यान आता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा प्रमुख, एका बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला केल्यावर आता पोलीस दलाकडून कायदेशीरपणे काम कसे होईल ?, असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आता महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा म्हणजे झाले, असाही टोलाही नाना पटोलंनी सरकारला लगावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT