Ratnagiri News: शाळेत गरबा खेळताना विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू! नेमकं घडलं काय?
Ratnagiri News : कोकणात राजापूर तालुक्यात दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली. शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

गोकुळ कांबळे
Ratnagiri News : कोकणात राजापूर तालुक्यात दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली. शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन नवरात्रोत्सवात राजापूर पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात हा दु:खद प्रसंग सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारा आहे. ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या घटनेने पाचल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (ratnagiri rajapur news girl dies due to dizziness while playing garba in school)
राजापूर तालुक्यातील आजीवली मानेवाडी येथील वैष्णवी प्रकाश माने वय १६ या विद्यार्थिनीचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमात हा दुर्दैवी प्रसंग घडला.
नवरात्रउत्सवात विविध ठिकाणी शाळेत देवी बसवली जाते देवीचे पूजन केली जाते व नवरात्रोत्सवाचा आनंदात लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच सहभागी होतात या पारंपरिक सणाचा आनंद घेताना ही परंपरा कळावी हा यामागे उद्देश असतो.










