सत्यनारायण पूजा, हळदी-कुंकू कार्यक्रमात राडा.. डोंबिवलीत परप्रांतियांची मुजोरी

सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाला अमराठी नागरिकांनी विरोध केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. ज्यामुळे इथे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमात राडा
सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमात राडा
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाला विरोध

point

डोंबिवलीत अमराठी नागरिकांची पुन्हा एकदा मुजोरी

point

सोसायटीतील वाद थेट पोलीस ठाण्यात

डोंबिवली: डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. डोंबिवलीमधील नांदीवली येथे एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला मराठी कुटुंबीयांना विरोध तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी केला. ज्यानंतर सोमवारी रात्री सोसायटीमध्ये जोरदार वाद झाला. (ruckus during satyanarayan puja and haldi kumku program migrants amarathi show opposing to marathi citizens in dombivli)

या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला आहे.

डोंबिवलीतील नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे.

हे ही वाचा>> Chhaava: 'संभाजी महाराजांपेक्षा काहीही मोठं नाही', राज ठाकरेंची भेट घेतली अन् दिग्दर्शक...

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये काही दिवसांपूर्वी रोजी सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला. 

काल रात्री सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत मराठी कुटुंबाने आरोप केलाय की, "अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला. आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले."

हे ही वाचा>> Viral News: ऐकावं ते नवलच! नवऱ्याने दातांनी कापले बायकोचे ओठ, बेडरुममध्ये असं घडलं तरी काय?

याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. अमराठी कुटुंबीयांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला. मात्र, या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी असा वाद उफाळून आला आहे.