Sachin Sathe: चिंचवड पोटनिवडणुकी आधी मविआला झटका, काँग्रेस नेता भाजपत
Chinchwad Bypolls 2023। Sachin Sathe quits congress and joined bjp: चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad Bypolls) मतदान अवघ्या काही तासांवर असताना पिंपरी चिंचवडचे काँग्रेसचे (Pimpri-Chinchwad Congress) माजी शहरप्रमुख आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रसेचे सचिव सचिन साठे (Sachin Sathe) यांनी महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) धक्का दिला. सचिन साठे यांनी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडत भाजपत (Bjp) प्रवेश केला आहे. […]
ADVERTISEMENT
Chinchwad Bypolls 2023। Sachin Sathe quits congress and joined bjp: चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad Bypolls) मतदान अवघ्या काही तासांवर असताना पिंपरी चिंचवडचे काँग्रेसचे (Pimpri-Chinchwad Congress) माजी शहरप्रमुख आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रसेचे सचिव सचिन साठे (Sachin Sathe) यांनी महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) धक्का दिला. सचिन साठे यांनी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडत भाजपत (Bjp) प्रवेश केला आहे. (Sachin Sathe joined bjp in presence of Devendra fadnavis)
ADVERTISEMENT
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, विजयासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने ताकद पणाला लावली आहे. अशातच सचिन साठे यांनी काँग्रेसला रामराम केल्यानं महाविकास आघाडीला फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपत प्रवेश
सचिन साठे यांनी महाराष्ट्र काँग्रेस सचिवपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला होता. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सचिन साठे यांनी गुरुवारी (23 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.
हे वाचलं का?
Chinchwad Bypolls: जिथे फडणवीसांची सभा, तिथूनच गेली अजित पवारांची रॅली
सचिन साठे 26 वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते कार्यरत
ऐन चिंचवड पोटनिवडणुकीच्या धामधुमीत सचिन साठे यांनी काँग्रेस सोडली. त्यामुळे चिंचवडमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन साठे हे पिंपरी चिंचवडमधील पिंपळनिलख भागातील आहेत. ते 26 वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते.
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवडमधील अनेक विषय पक्षाकडे मांडले होते. त्याची दखल पक्षाकडून घेतली गेली नाही. पक्षाकडून उपेक्षा होत असून, अशा परिस्थिती पक्षात थांबणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडली.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray: ‘विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते’, ठाकरेंचं मोठं विधान
Sachin Sathe : बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष असतानाही दिला होता राजीनामा
सचिन साठे यांनी 2020 मध्येही राजीनामा दिला होता. त्यावेळी सचिन साठे यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख पदाची जबाबदारी होती. विधान परिषद निवडणुकीत तिकीट देण्याची अपेक्षा सचिन साठे यांना होती, मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर साठे यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला होता. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी सचिन साठे यांचा राजीनामा फेटाळला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT