"माझा भाऊ डॉन, हाफ नाही तो डायरेक्ट फूल मर्ड....", दारूच्या नशेत पोरींचा भर रस्त्यात राडा

मुंबई तक

व्हिडिओमध्ये दिसतंय की, नशेच्या अवस्थेत असलेल्या या मुली रस्त्यावर एकमेकींवर ओरडत आणि शिवीगाळ करत होत्या. तसंच आमचा भाऊ डॉन असल्याचं म्हणत होत्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"माझा भाऊ डॉन, मला पोलीसही काही करू शकत नाही"

point

संभाजीनगरमध्ये मद्यधुंद तरूणींंचा रस्त्यात राडा

छत्रपति संभाजीनगर : वाळूज परिसरातील महावीर चौकाजवळ नशेत धुंद असलेल्या दोन मुलींनी रस्त्यावर गोंधळ घातला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. यावेळी त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना शिवीगाळ करत "आमचा भाऊ डॉन आहे, तो हाफ मर्डर नाही, थेट मर्डर करतो," अशी खुलेआम धमकीही दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

व्हिडिओमध्ये दिसतंय की, नशेच्या अवस्थेत असलेल्या या मुली रस्त्यावर एकमेकींवर ओरडत आणि शिवीगाळ करत होत्या. एका मुलीने तर "पोलिस माझं काहीच करू शकत नाही," असा दावाही केला. स्थानिक नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयास केला, मात्र त्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. काही वेळाने नशेमुळे त्यांना चालताही येईना, त्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला बसल्या.

हे ही वाचा >> पोलीस कर्मचाऱ्यानं लेकीला संपवलं, नंतर स्वत:चाही केला शेवट; नाशिकमधली थरकाप उडवणारी घटना काय?

या घटनेनं परिसरात बराच वेळ रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. व्हायरल व्हिडिओवरून नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कोणती कारवाई केली, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

क्रांती चौकातही महिलांचा राडा

हे ही वाचा >> ढाब्यावरचं ते जेवण शेवटचं ठरलं! संभाजीनगरमध्ये कारचा अपघात, तीन मित्र जागीच ठार, तर दोघे...

दरम्यान, संभाजीनगरच्या समर्थनगर परिसरातही काही महिलांनी गोंधळ घातल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. "चंगळ्या बोले कुहू" असा सोशल मीडियावरच्या एका रीलमधील डायलॉग म्हणत या महिलांनी गोंधळ घातला होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp