Seema Haider: पाकिस्तानी भाभी पाचव्यांदा बनली आई, सीमाने दिला सचिनच्या बाळाला जन्म; पण नाव..
Seema Haider 5th Child: मूळची पाकिस्तानी पण लग्नानंतर भारतीय झालेल्या सीमा हैदर हिने आपल्या पाचव्या बाळाला जन्म दिला आहे. जाणून सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या रंजक कथेविषयी.
ADVERTISEMENT

Seema Haider and Sachin Meena: छाया काविरे, मुंबई: साधारण 2 वर्षांपूर्वीची गोष्टी आहे, पाकिस्तानी भाभी म्हणून सर्व देशाचं लक्ष एका 21 वर्षाच्या महिलेनं वेधून घेतलं होतं. पबजी गेम खेळताना ती एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आणि चक्क पाकिस्तानातून ती आपल्या ऑनलाईन प्रेमाच्या शोधात अवैध मार्गाने भारतात पोहचली. तेही आपल्या 4 मुलांसह. भारतात येत तिने आपल्या प्रेमाला, सचिन मीणा या तरूणाला गाठलं. त्यानंतर पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर ही प्रचंड व्हायरल झाली. मात्र, आता पुन्हा एकदा सीमा हैदर चर्चेत आली आहे? या चर्चेला एक इन्ट्रेस्टींग कारण आहे. नेमकं काय ते आपण जाणून घेऊया.
पाकिस्तानहून भारतात आलेली सीमा हैदर ही आता पाचव्यांदा आई झाली आहे. नोएडातल्या कृष्णा रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिला आहे. मात्र, मुलं जन्माला येणं यात विशेष असं काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. म्हणजे मुलं तर सगळ्यांनाचं होतं, असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, सीमा हैदरची स्टोरीच मुळात इन्ट्रेस्टिंग आहे.
हे ही वाचा>> Viral Video: ‘पाव किलोचा सचिन, 5 किलोची सीमा.. त्याच्यावर बसली तर’, ही महिला असं का..
सीमाचं हे पाचवं आणि सचिन मीणाचं पहिलं मूल आहे. याआधी तिला तिच्या पाकिस्तानी पतीपासून चार मुलं आहेत. तर भारतीय पती सचिन मीणापासून हे तिचं पहिलं अपत्य आहे. मात्र, ही सीमा हैदर भारतात पोहचली कशी आणि पोहचली तेव्हा काय घडलं? थोडसं फ्लॅश बॅकमध्ये जाऊयात.
पाकिस्तानी सीमा भारतात आली तरी कशी?
सीमा हैदर आणि गुलाम हैदर यांचं 2014 मध्ये पाकिस्तानात लग्न झालं. 2019 मध्ये, गुलाम हैदर सीमा आणि चार मुलांना कराचीत सोडून दुबईला गेला. आता हा काळ होता कोरोना महामारीचा. त्याच दरम्यान PUBG नावाच्या एक गेमने अनेकांना पार येडं करुन सोडलं होतं. फावला वेळ म्हणून अनेकांसारखं सीमाही पबजी खेळू लागली. पण ऑनलाईन गेम खेळता-खेळता सीमाची नोएडातल्या रबुपुराचा रहिवासी असलेल्या सचिन मीणाशी ओळख झाली. त्यानंतर 10 मार्च 2023 ला सीमा आणि सचिन नेपाळमध्ये समोरासमोर भेटले. तिथे त्यांनी मंदिरात लग्न केलं. त्यानंतर नेपाळहून सीमा परत पाकिस्तानला गेली आणि सचिन नोएडाला आला.
दोन महिन्यांनी म्हणजे 13 मेला सीमा पुन्हा पाकिस्तानहून दुबईमार्गे नेपाळला आली. राबुपुरात पोहोचण्यासाठी नेपाळहून ती बसने निघाली. 1 जुलैला सचिन आणि सीमा यांनी त्यांचं भारतीय ओळखपत्र बनवण्यासाठी बुलंदशहरमधल्या एका वकिलाची भेट घेतली आणि तिथेच पबजी गेम खेळणाऱ्या सीमा-सचिनचा गेम झाला. सीमा पाकिस्तानी असल्याचं वकिलाने पोलिसांना सांगितलं.
हे ही वाचा>> सीमा हैदरने दिली गुड न्यूज, सचिनच्या बाळाची आई होणार
पोलीस शोध घेऊ लागले. त्यामुळे सीमा आणि सचिन दोघंही घरातून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आणि 3 जुलैला सीमा आणि सचिन यांना हरियाणातल्या बल्लभगडमधून ताब्यात घेण्यात आलं. 4 जुलै 2023 ला पोलिसांनी सचिनच्या वडीलांना अटक केली. 8 जुलैला तिघांनाही कोर्टाकडून जामीन मिळाला. त्यानंतर एटीएसने सीमा आणि सचिनची चौकशी केली. त्या दरम्यान सीमा आणि सचिनच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया याचिकेत सीमाने हे फोटो जोडले होते.
परिस्थिती हलाखीची होत गेली. मात्र, तरी सीमा-सचिनने एकमेकांची साथ सोडली नाही. 30 जुलै 2023 ला सीमाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये तिने विनंती केली की त्यांच्याकडे खाण्या-पिण्यासाठीही पैसे नाहीत. वादात सापडलेल्या सीमाला सॉफ्ट कॅार्नर मिळाला. प्रेमासाठी पाकिस्तानातून भारत गाठणाऱ्या सीमाचं प्रेमी युगुलांनी कौतुक केलं. तर, चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांनी सीमा-सचिनवर 'कराची ते नोएडा' चित्रपट बनवण्याची घोषणा केली, ज्याचा प्रोमोही शूट करण्यात आला.
सीमा हैदरने दिला पाचव्या बाळाला जन्म
या सगळ्या दरम्यान पाकिस्तानी गुप्तहेर म्हणूनही सीमावर संशय घेण्यात आला. हळूहळू दिवस गेले तसं सीमा-सचिनला लोकं विसरत गेले. दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करत त्या दोघांचा संसार सुरु झाला. त्यानंतर सीमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यावर सचिन मीणाच्या कुटुंबानं सांगितलं, "हा कुटुंबासाठी एक नवीन अध्याय आहे. आम्ही लवकरच बाळाचं नाव ठेवू."
तर, दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील इरफान फिरदौस म्हणाले, "मुलीचा जन्म भारतात झाला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी कुठंही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आपल्या संविधानात जन्माने मिळालेल्या नागरिकत्वाला प्राधान्य देण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, मुलीला स्वतः भारतीय नागरिक मानलं जाईल," असंही उच्च न्यायालयाच्या वकिलांनी सांगितलं आहे.