'हा' रिल स्टार आहे तरी कोण? डोंबिवलीच्या सुरेंद्र पाटलाच्या पोलिसांनी नाशिकमधून आवळल्या मुसक्या, नेमकं काय घडलं?
Dombivali Crime News: डोंबिवलीतील प्रसिद्ध रीलस्टार सुरेंद्र पाटीलवर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटीलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आरोपी सुरेंद्र पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल
आरोपी सुरेंद्र पाटील विरोधात 14 गुन्हे दाखल
पोलिसांनी नाशिकमधून आरोपीला ठोकल्या बेड्या
Dombivali Crime News: डोंबिवलीतील प्रसिद्ध रीलस्टार सुरेंद्र पाटीलवर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटीलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. एका घटस्फोटीत महिलेने वारंवार बलात्काराचा केल्याच्या आरोप करत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुरेंद्र पाटीलवर गुन्हा दाखल झाला. या गंभीर प्रकरणात ठाणे खंडणी विरोधी पथकांनी आरोपी सुरेंद्र पाटीलला नाशिक मधून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर्ली येथील रहिवासी सुरेंद्र पाटीलच्या एका गाळ्यात पीडित महिलेने व्यवसाय सुरू केला होता. महिला कागदी प्लेट बनवून आपला उदरनिर्वाह करत होती. परंतु,व्यवसायात नुकसान झाल्याने तो बंद करावा लागला. महिलेला आपल्या मशिनरीजची परतफेड हवी असल्याने ती मशिनरी घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाटीलने मशिनरी परत देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पडणार पावसाच्या हलक्या सरी! 'या' ठिकाणी घोंगावणार सोसाट्याचा वारा
आरोपी सुरेंद्र पाटीलच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
तसेच तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटीलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. कल्याण डोंबिवलीतील महात्मा फुले कोळसेवाडी मानपाडा आणि रामनगर मध्ये आरोपी सुरेंद्र पाटील विरोधात 14 गुन्हे दाखल असून तो फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांनी आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा शोध घेतला. तो नाशिकच्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्यानंतर इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी नाशिकच्या हॉटेलमधून आरोपीला ताब्यात घेतले.
कोण आहे सुरेंद्र पाटील?
सुरेंद्र पाटील हा एक सोशल मीडिया influencer आणि रील्स स्टार म्हणून ओळखला जाते, ज्याने आपल्या स्टायलिश आणि अनोख्या रील्स व्हिडिओंद्वारे अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली होती. तो मूळचा डोंबिवलीमधील असून, त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत.










