10 वीची परीक्षा पास होण्यासाठी 500 रुपये आणि... विद्यार्थ्यांचे कारनामे पाहून शिक्षकही हैराण

मुंबई तक

21 मार्च ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत कर्नाटक एसएसएलसी (10 वी) च्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कर्नाटक बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी फक्त उत्तरच नव्हे तर पैसे, लव्ह लेटर आणि भावुक पद्धतीने विनंती केल्याचं दिसत आहे.

ADVERTISEMENT

उत्तरपत्रिकेत लाच देण्यासाठी ठेवले 500 रुपये तर लिहिलं लव्ह लेटर
उत्तरपत्रिकेत लाच देण्यासाठी ठेवले 500 रुपये तर लिहिलं लव्ह लेटर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कर्नाटक बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

point

बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत 500 रुपये ठेवून लाच देण्याचा प्रयत्न

point

उत्तरपत्रिकेत उत्तरांऐवजी लिहिली लव्ह स्टोरी

बंगळुरू: 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. 21 मार्च ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत कर्नाटक एसएसएलसी (10 वी) च्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेचा निकाल मे महिन्यात लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, निकालाच्या आधी कर्नाटक बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कारण, उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी फक्त उत्तरच नव्हे तर पैसे, लव्ह लेटर आणि भावुक पद्धतीने विनंती केल्याचं दिसत आहे.

कर्नाटकातील चिक्कोडी येथे दहावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणारे काही शिक्षक तसेच परीक्षेचे निरीक्षण करणारे लोक हसत होते तर काहींनी डोक्यालाच हात लावला.

उत्तरपत्रिकेत 500 रुपये ठेवून लाच देण्याचा प्रयत्न

एका विद्यार्थ्याने तर चक्क त्याच्या उत्तरपत्रिकेत 500 रुपयांची एक नवी कोरी नोट ठेवली आणि त्यात लिहिले, "प्लीज सर, मला पास करा." आता ही मस्करी होती, धाडस होते की शेवटची आशा? हे फक्त त्या विद्यार्थ्यालाच माहीत. पण हे पाहून शिक्षक तर खूप हसायला लागले.

"माझं प्रेम तुमच्या हातात आहे, प्लीज मला पास करा"

कर्नाटकातील एका दहावीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाला पास होण्याचे असे कारण दिले की शिक्षकही ते पाहून आश्चर्यचकित झाले. त्या विद्यार्थ्याला त्याची मैत्रीण त्याला सोडून जाईल किंवा कदाचित पुढच्या वर्गात जाईल, या कारणामुळे पास व्हायचे आहे! विद्यार्थ्याने त्याच्या उत्तरपत्रिकेत लिहिले, "माझे प्रेम तुमच्या हातात आहे, प्लीज मला पास करा."

हे वाचलं का?

    follow whatsapp