Ganpat Gaikwad : ‘मुख्यमंत्र्यांना अटक करा!’, फडणवीसांना घेरलं; ठाकरेंचे 4 सवाल
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर भाष्य करताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अटक करण्याची मागणी केलीये… नेमकं सामना अग्रलेखात काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray’s Shiv Sena Bjp Mla Ganpat Gaikwad Eknath Shinde : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, शिंदे आणि महायुती सरकारला लक्ष्य करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट मुख्यमंत्री शिंदेंना अटक करण्याची मागणी केलीये.
‘गुंडांचे राज्य! मुख्यमंत्र्यांना अटक करा!’, या मथळ्याखालील अग्रलेख सामनात प्रसिद्ध झाला आहे. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारासह राज्यात यापूर्वी घडलेल्या घटनांची यादी वाचून दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारला धारेवर धरल्याचे दिसत आहे. वाचा सामना अग्रलेखात नेमकं काय केलंय भाष्य?
शिवसेनेने UBT सामनात काय म्हटलंय?
“पोलीस ठाण्यांवरच हल्ले करणे, पोलीसप्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश, बिहारात अनेकदा घडते. आता हे प्रकार महाराष्ट्रात घडू लागले व या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत.”
हेही वाचा >> गोळ्या झाडणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलासोबत काय घडलं, पहा Video
“शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारांचीच पैदास होईल, असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात गेले आहेत. उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शिंदे गँगचे दोन सदस्य जखमी झाले. स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले व हळहळले.”