चार मुलं असलेल्या महिलेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं! अख्ख्या गावाने पाहिलं अन् नंतर घडलं भयंकर..
Shocking Love Story Viral : झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील बोरियो पोलीस ठाणे हद्दीतील बास्को गावात एक खळबळजनक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विवाहित महिलेला प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत पकडलं!

त्या गावात घड़ली धक्कादायक घटना

पोलिसांनी तपास सुरु करताच, घडलं असं काही...
Shocking Love Story Viral : झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील बोरियो पोलीस ठाणे हद्दीतील बास्को गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. गावातील स्थानिक लोकांनी एका विवाहित महिलेला तरुणासोबत विचित्र अवस्थेत पाहिलं. या महिलेला चार मुलं असून ती 30 वर्षांची असल्याचं समजते.
त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
उमेश सिंह (22) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरूण वनगांवा येथील रहिवासी असून तो टेम्पो चालक आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना गावातच विचित्र अवस्थेत लोकांनी पकडलं आणि सरपंचासमोर उभं केलं. त्यानंतर दोघांनाही दहा तास रस्सीने बांधून ठेवलं. लोकांनी बैठक बोलावली आणि ऑन द स्पॉट निर्णय घेतला.
हे ही वाचा >> भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंगाचा आरोप, चहाच्या टपरीवर नेमकं काय घडलं होतं
दोघांनाही तीन लाखांचा दंड ठोठावला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेच्या पतीनं सांगितलं की, त्याला आधीपासूनच संशय होता की, दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु आहेत. तरुणाच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटलंय की, तो फक्त महिलेला टॅम्पोतून गावात सोडायला आला होता.
पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरु केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही ताब्यात घेतलं. एसडीपीओ किशोर तिर्कीने सांगितलं की, आतापर्यंत कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा >> प्रेमात वेडीपिशी झाली..तरुणीला शोधत होते 11 राज्याचे पोलीस! अहमदाबाद प्लेन क्रॅशचं कनेक्शन आलं समोर
त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना
बिहारमध्ये एका महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिच्याच मुलाला पाठविण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याने व्हिडिओ इतर महिलांनाही दाखवले आहेत. महिलेनं विरोध केला असता, आरोपीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पीडित महिलेने म्हटलं की, 'भोला इथपर्यंतच न थांबता त्याने माझ्या भांगेत कुंकू भरलं आणि सोबत राहण्याची जबरदस्ती केली. मी प्रतिकार करत विरोध केला. पण त्याने अश्लील व्हिडिओ बनवले आणि माझ्या मुलाला पाठवले.'दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी भोला रविदासविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.