'हा' VIDEO तुम्हाला विचलित करू शकतो, मुलगी मम्मी-मम्मी ओरडत राहिली अन् Reel च्या नादात महिला थेट...
उत्तरकाशीच्या मणिकर्णिका घाटावर सर्वांनाच चकित करणाऱ्या एका भीषण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक महिला फोटो किंवा व्हिडीओ काढताना गंगा नदीत वाहून गेली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उत्तरकाशीमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा, नेमकं काय घडलं?
रील बनवण्यासाठी महिला नदीत उतरल्यानंतर काय घडलं?
Viral Video: उत्तरकाशीच्या मणिकर्णिका घाटावर सर्वांना हादरवून टाकणाऱ्या एका भीषण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 14 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला फोटो किंवा व्हिडीओ काढण्याच्या नादात थेट गंगा नदीत वाहून गेली. ती महिला कॅमेऱ्याकडे पाहत-पाहत नदीकडे जात होती. पण त्याचवेळी तिचा अचानक तिचा पाय घसरला आणि ती गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. असे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे .
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नदीचा प्रवाह जोरदार असल्यामुळे महिला स्वत:ला सांभाळू शकली नाही आणि गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. दरम्यान, जेव्हा महिला वाहून जात होती तेव्हा तिची मुलगी 'मम्मी-मम्मी...' असा टाहो फोडत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र, अद्याप ही महिला सापडलेली नाही.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, लोक सेल्फी आणि रीलच्या नादात आपला जीव धोक्यात घालत असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.










