Bhole Baba: ज्याच्या सत्संगात 100 जणांचा जीव गेला तो भोले बाबा आहे तरी कोण?
Hathras Stampede Latest Update:उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबा याच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जाणून घ्या कोण आहे हा भोले बाबा.
ADVERTISEMENT
Hathras Stampede Latest Update: हाथरस (उ. प्रदेश): उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे, ज्यामध्ये चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत तब्बल 116 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरातील हाथरस-एटा सीमेवर असलेल्या फुलराई गावात भोले बाबा उर्फ साकार विश्व हरी महाराज यांचा सत्संग सुरू असताना ही दुर्घटना घडली. या सत्संगात एटा, कासगंज आणि हाथरस जिल्ह्यांतील तसेच आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील हजारो लोक उपस्थित होते. या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अनेक महिला, मुले आणि पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (who is bhole baba alias narayan sakar hari in whose satsang hundreds of people lost their lives in hathras)
ADVERTISEMENT
कोण आहे हा भोले बाबा?
मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी याचा जन्म तत्कालीन एटा जिल्ह्यातील पटियाली तहसीलमधील बहादूरपूर गावात झाला होता. परिसरातील लोक त्याला त्याच्या खऱ्या नावाऐवजी भोले बाबा उर्फ साकार विश्व हरी या नावाने ओळखतात. जो स्वत: आपण IB मध्ये कार्यरत असल्याचा दावाही करतो. भोले बाबाने नोकरी सोडल्यानंतर प्रवचन देण्यास सुरुवात केली होती. असा दावा केला जातो की 26 वर्षांपूर्वी बाबाने आपली सरकारी नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. भोले बाबाचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत.
विशेष म्हणजे इंटरनेटच्या युगात साधू-संत आणि कथावाचकांप्रमाणे हा भोले बाबा सोशल मीडियापासून दूर आहे. बाबाचे कोणत्याही सोशल मीडियावर अधिकृत अकाउंट नाही. असे म्हणतात की, कोरोनाच्या काळातही बाबाने एक सत्संग केला होता, ज्यामध्ये परवानगीपेक्षा जास्त लोक आल्याचे समोर आले होते.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> बाबाचा सत्संग बेतला जीवावर, 100 हून अधिक लोकांचा एका झटक्यात मृत्यू!
हाथरस येथे झालेल्या भीषण अपघातानंतर सत्संगात प्रवचन देणारा भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी हा आता नेमका कोठे आहे याच ठावठिकाणा सध्या तरी नाही.
दुसरीकडे, या अपघातात जखमी झालेल्यांवर एटा आणि हाथरस येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुःखद अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार, मंत्री लक्ष्मी नारायण आणि सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> विरोधकांनी केलं PM मोदींना हैराण, का होती सुरू सलग तासभर घोषणाबाजी?
नेमकं काय घडलं सत्संगात?
एका महिलेने सांगितले की, 'आम्ही दर्शनासाठी आलो होतो. खूप गर्दी होती. चेंगराचेंगरी झाली तेव्हा मी आणि माझा मुलगाही गर्दीत खाली पडलो.' जखमी आईसोबत रुग्णालयात पोहोचलेल्या एका मुलीने सांगितले की, 'सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. आम्ही शेतातून निघालो होतो, तेवढ्यात अचानक जमावाने ढकलायला सुरुवात केली, त्यामुळे बरेच लोक खाली चिरडले गेले. आमच्यासोबत आणखी एक व्यक्ती आली होती. जिचा मृत्यू झाला आहे.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT