Hathras stampede: बाबाचा सत्संग बेतला जीवावर, 100 हून अधिक लोकांचा एका झटक्यात मृत्यू!
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने 100 हून अधिक जाणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

Hathras Satsang stampede: हाथरस (उ. प्रदेशः): संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी एक घटना ही उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रतिभानपूर येथे घडली आहे. येथे भोले बाबाच्या सत्संगात प्रचंड चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये तब्बल 107 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत 107 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अलीगढच्या आयुक्तांनी दिली आहे. तसेच यामध्ये 18 लोक जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे. (stampede in bhole baba satsang more than 100 people died cm yogi will go to hathras tomorrow)
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे आणि घटनास्थळी मदतकार्याला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. एडीजी आग्रा आणि आयुक्त अलीगढ यांच्या नेतृत्वाखाली घटनेच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सीएम योगींच्या सूचनेनंतर सरकारचे दोन वरिष्ठ मंत्री आणि डीजीपीसह मुख्य सचिवही घटनास्थळी रवाना झाले.
सीएम योगी बुधवारी जाणार हाथरसला
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या बुधवारी हाथरसला जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. जिथे मुख्यमंत्री पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रधान सचिव संजय प्रसादही उपस्थित राहणार आहेत.