Raigad Fort: रायगडावर असं का घडलं?, ही दृश्य पाहून तुम्हीही हादरून जाल!

मुंबई तक

Raigad Fort Video: रायगड किल्ल्यावर अचानक आलेला पाऊस आणि धबधब्याप्रमाणे वाहणारे पाणी यामुळे पर्यटकांची अक्षरश: भंबेरी उडाली. पण नेमकं हे कशामुळे घडलं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

रायगडावर असं का घडलं?
रायगडावर असं का घडलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रायगडावर नेमकं काय घडलं?

point

रायगडावर पावसाचं रौद्र रुप

point

रायगड किल्ला पर्यटकांसाठी करण्यात आला बंद

Raigad Fort Rain Video: रायगड: रायगड जिल्ह्यात काल (7 जुलै) दुपारी साडेतीन ते चार वाजेपर्यंत प्रचंड मुसळधार पाऊस झाला. त्याचवेळी पावसाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर आलेले काही पर्यटकांची चांगली त्रेधातिरपीट उडाली. अचानक मुसळधार पावसामुळे किल्ल्याच्या महादरवाजातून पाण्याचे प्रचंड लोट वाहू लागले. ज्यामुळे अनेक पर्यटक हे गडाच्या पायऱ्यांवरच अडकले. यावेळी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या या पाण्यापासून पायऱ्यांवर अनेक पर्यटक स्वत:चा बचाव करत होते. दरम्यान, अंगावर काटा आणणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने ही संपूर्ण घटना आता समोर आली आहे. मात्र, नेमकी ही घटना कशी घडली हे आता समोर आलं आहे. (why did this happen at raigad fort where did such huge water come from you too will be shocked after watching this video)

किल्ल्याच्या पायऱ्यांवर अडकलेल्या पर्यटकांचा हादरवून टाकणारा व्हिडिओ 

वास्तविक, रायगड जिल्ह्यात असलेला रायगड हा किल्ला पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. मात्र, काल संध्याकाळचा पाऊस पर्यटकांसाठी अक्षरश: जीवावर बेतणारा ठरला. 

हे ही वाचा>> Maharashtra Weather forecast : पुणेकरांनो, काळजी घ्या! महाराष्ट्र 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

पावसाचा आनंद लुटण्यासाठी काल अनेक पर्यटक हे रायगडावर आले होते. पण, अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्याचवेळी किल्ल्याच्या महादरवाज्यातून अचानक पाण्याचे प्रचंड लोट वाहू लागले. त्यावेळी महादरवाज्याच्या पायऱ्यांवर असलेले अनेक पर्यटक हे भांबावून गेले आणि तिथेच अडकून पडले. दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याचा व्हिडिओही समोर आला. 

या व्हिडीओमध्ये किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पाणी प्रचंड वेगाने पायऱ्यांवरून वाहताना दिसत आहे. दरम्यान, अनेक पर्यटक पायऱ्यांवर अडकले होते. पण त्याचवेळी पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतीचा आधार घेत पर्यटकांनी आपला स्वत:चा बचाव केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp