'मागील जन्मात तु अप्सरा होतीस, घटस्फोटानंतर दुसरं लग्न करेन...', भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड
Ashok Kharat : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातबाबत दररोज एक महत्त्वाची अपडेट समोर येऊ लागली आहे. अशोक खरातच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून निघाले आहे. सर्वज्ञ देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या या भोंदूने केवळ धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांची फसवणूक केली. एवढंच नाहीतर महिलांचा विनयभंग करत त्यांच्या प्रतिष्ठेचा भंग देखील केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
खरातने गैरफायदा घेत पीडित महिलेशी नको तेच केलं...
घटस्फोटाच्या भीतीने पीडितेला जाळ्यात ओढत केले अत्याचार
Ashok Kharat : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातबाबत दररोज एक महत्त्वाची अपडेट समोर येऊ लागली आहे. अशोक खरातच्या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या या भोंदू बाबा अशोक खरातने केवळ धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांची भयंकररित्या फसवणूक केली. एवढंच नाहीतर महिलांचा विनयभंग करत त्यांच्या प्रतिष्ठेचा भंग केल्याची माहिती समोर आली आहे. विवाहित महिलेला देवदूत असल्याचे सांगून तिचे आयुष्य बर्बाद केलं, याचमुळे आता बाबाचा चेहरा या प्रकरणाने जगासमोर आला.
हे ही वाचा : मदरशात 70 वर्षीय मौलानाने अल्पवयीन मुलीवर केलं नको तेच... कोणाला काहीही न सांगण्याची दिली धमकी अन् पुढे...
खरातने गैरफायदा घेत पीडित महिलेशी नको तेच केलं...
सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा एकप्रकारे थ्रिलरहून भयानक आहे. अशातच कौटुंबिक वादातून मानसिकदृष्ट्या खचलेल्या एका विवाहित महिला, यावर तोडगा निघेल या आशेनं खरातकडे गेली होती. पण खरातने याचा गैरफायदा घेत, तिला भुलवलं. तु एक सामान्य स्त्री आहेस, तुझे ग्रह दर्शवतात की, तुझा घटस्फोट आधीच झालेला आहे.
घटस्फोटाच्या भीतीने पीडितेला जाळ्यात ओढत केले अत्याचार
खरातने त्या स्त्रीला घटस्फोटाच्या भीतीने आणि देवदूत असल्याच्या खोट्या भ्रमातून पूर्णपणे जाळ्यात अडकवले. त्याने धार्मिक विधी, तांत्रिक उपचारांच्या नावाखाली वारंवार लैंगिक अत्याचार केला, एवढंच नाहीतर तिला कार्यालयात बोलावून जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. तिचे विवाह होणे निश्चित आहे आणि तो 2025 मध्ये तिच्याशी विवाह करून तिला सुखी करेल, असे सांगून त्याने पीडितेची फसवणूक केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : जालन्यात रेड्याच्या टकरीवरून दोन गटांत वाद, हाणामारीत तरुणाचा दुर्दैवी अंत, 15 दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
एसआयटीच्या तपासातून खरातकडे अशी उपकरणे आहेत, जी कोणालाही चकित करु शकतात. लोकांना घाबरवण्यासाठी त्याने खोटा साप देखील बनवला होता. अघोरी, पूजा, काळी जादू आणि अनेक अक्षेपार्ह व्हिडिओचे पुरावे जप्त करण्यात आले होते.









