सुषमा अंधारेंविरुद्ध निषेध यात्रा! वारकऱ्यांकडून 'ठाणे बंद'ची हाक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वीच्या केलेल्या विधानावरून काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत...
varkari organization protest against shiv sena leader sushma andhare
varkari organization protest against shiv sena leader sushma andhare

हिंदू धर्मातील देवी-देवता आणि संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रात सध्या वाद निर्माण झालाय. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून, ठाण्यात शनिवारी (17 डिसेंबर) निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने वारकऱ्यांनी ठाणे बंदची हाक दिलीये.

'हिंदुत्व संपवण्याचा विडा उलचलेल्ल्या निर्बुद्ध बाईने छळ मांडला आहे,' असा आरोप करत वारकरी संघटना सुषमा अंधारेंविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी उद्या (17 डिसेंबर) मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. असं असलं तरी निषेध यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानांवर बोलण्यास चुप्पी साधली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून आता ठाण्यातील वारकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. वारकरी संघटनांना जैन धर्मीय, हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दिला आहे.

varkari organization protest against shiv sena leader sushma andhare
महाविकास आघाडीच्या 'महामोर्चा'ला 13 अटींसह परवानगी, काय म्हटलंय आदेशात?

सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वारकरी आणि धार्मिक संस्था एकत्रित निषेध मोर्चा काढणार आहेत. 17 डिसेंबर रोजी जुने ठाणे महानगरपालिका येथील विठ्ठल मंदिर येथून निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. ही निषेध यात्रा दुपारी बारा वाजता सुरू होणार असून, यात्रेचा शेवट टेंभी नाका येथे होणार आहे.

निषेध यात्रा शांतते काढली जाणार असून, ठाणेकरांनी ठाणे शहर बंद ठेवून शांततेच्या मार्गाने या निषेध यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन ह.भ.प. विलास फापाळे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

varkari organization protest against shiv sena leader sushma andhare
राऊतांची पाठ फिरताच शिंदेंनी केला गेम; नाशका शिवसेनेला पडलं खिंडार

छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांवरील विधानांवर वारकऱ्यांचं मौन

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांवर होत असलेल्या इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य होत आहेत त्याबाबत वारकऱ्यांना विचारण्यात आलं. त्यावर वारकरी संप्रदायाने याबाबत बोलण्यास चुप्पी साधली. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर बोलण्याचं टाळलं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in