Arvind Kejriwal : दोन पत्र... अण्णा हजारे केजरीवालांवर का रागावले?
Anna hazare : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. दिल्ली नवीन मद्य धोरण प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT
Arvind Kejriwal Anna Hazare : (रोहित वाळके, अहमदनगर) दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. केजरीवाल यांच्या अटक झाल्यानंतर मुंबई Tak ने अण्णा हजारेंसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. "त्यांनी माझे ऐकले नाही याचे मला वाईट वाटते", असेही अण्णा हजारे म्हणाले आहेत.
अण्णा हजारे म्हणाले की, "दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी केजरीवाल यांना नवीन मद्य धोरणाबाबत दोनदा पत्रे लिहिली होती. त्यांनी माझे ऐकले नाही, याचे मला वाईट वाटते आणि आता यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे."
हेही वाचा >> CM केजरीवालांना अटक, उद्धव ठाकरेंना 'मेसेज'
ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवर हजारे म्हणाले, "आंदोलनावेळी केजरीवाल आणि मनिष सिसोदिया आमच्यात सामील झाले होते, तेव्हा मी त्यांना नेहमी देशाच्या हितासाठी काम करण्यास सांगितले होते. पण त्यांनी हे लक्षात ठेवले नाही."
"आता मी त्यांना कोणताही सल्ला देणार नाही. कायदा आणि सरकारला जे काही करायचे आहे ते करावे", असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.