Advertisement

Cm Eknath Shinde: "कोरोना झालेला असताना नाना पाटेकरांचे सगळे चित्रपट पाहिले"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुण्यातल्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं
Watched all the movies of Nana Patekar when I was Corona Patient Says CM Eknath Shinde in Pune
Watched all the movies of Nana Patekar when I was Corona Patient Says CM Eknath Shinde in Pune

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नाना पाटेकर यांनी मला मागच्या आठवड्यात फोन केला होता. त्यावेळी गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात आलात तर घरच्या गणपतीच्या दर्शनालाही या असं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आज नाना पाटेकर यांच्या घरी येऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नाना पाटेकर आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध अनेक वर्षांपासून आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Watched all the movies of Nana Patekar when I was Corona Patient Says CM Eknath Shinde in Pune
एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार?; दीपक केसरकरांनी केला खुलासा

कोरोना झालेला असताना नाना पाटेकरांचे सगळे चित्रपट पाहिले

नाना पाटेकर हे माझे आवडते कलाकार आहेत. मला जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा मी त्यांचे सगळे चित्रपट पाहिले. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसंच सिंहगडाच्या पायथ्याशी नाना पाटेकरांनी जो वाडा बांधला आहे तो खरोखरच खूप छान आहे. नाना पाटेकरांचा जागेचा चॉईस उत्तम आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. निसर्गरम्य ठिकाणी नाना पाटेकर यांनी घर बांधलं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सिंहगड ही पावनभूमी आहे

सिंहगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी आलं की प्रसन्न वाटतं. नाना पाटेकर यांनी जागेचा चॉईस उत्तम केला आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. निसर्गाच्या सान्निध्यात नाना पाटेकरांनी घर बांधलं आहे. ही चांगली गोष्ट आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in