मुंबईत १९ वर्षांच्या महिलेवर तीन महिने सामूहिक बलात्कार, खळबळजनक घटना उघड

मुंबई तक

मुंबईतल्या कुर्ला या उपनगरात एका १९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये महिलेच्या बहिणीच्या नवऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणातल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मूळची कोलकाता येथील आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईतल्या कुर्ला या उपनगरात एका १९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये महिलेच्या बहिणीच्या नवऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणातल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मूळची कोलकाता येथील आहे. काही महिन्यांपूर्वी ती मुंबईत आली होती. त्यावेळी तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला कुर्ला या ठिकाणी एका खोली मालकाकडे नेलं. त्या भागात काही भिकारीही भाडे तत्त्वावर घर घेऊन राहात होते. याच घरातल्या भिकाऱ्यांकडून पैसे घेऊन पीडित महिलेच्या भावोजीने पीडित महिलेला त्यांच्या स्वाधीन केलं. एवढंच नाही तर पीडित महिलेच्या बहिणीच्या नवऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला.

पुण्यात 21 वर्षीय महिलेवर एकाच दिवशी दोनदा बलात्कार; आरोपी अटकेत

पीडित महिला शहरात नवीन असल्याने आणि तिच्यासोबत हा प्रकार घडल्याने घाबरून गेली होती. तिने याविषयी कुणाला काहीही सांगितलं नाही. काही दिवसांनी ही पीडित महिला गरोदर असल्याची बाब उघड झाली. त्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या बहिणीच्या नवऱ्यासह चार जणांना अटक केली आहे. यातला एक जण फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पाचवा आरोपी पश्चिम बंगालमध्ये पळाल्याचं कळतं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp