श्रद्धा वालकर हत्या: आफताबचा नार्को टेस्टमध्ये खळबळजनक खुलासा, म्हणाला…

मुंबई तक

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची (Aftab) गुरुवारी (1 डिसेंबर) दिल्लीतील रोहिणी येथील शासकीय रुग्णालयात नार्को चाचणी करण्यात आली. FSL चे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितले की, आफताबने नार्को टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची (Shaddha Murder) कबुली दिली आहे. एवढेच नाही तर आफताबने नार्को टेस्टमध्ये सांगितले की, त्याने श्रद्धाचा मोबाइल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची (Aftab) गुरुवारी (1 डिसेंबर) दिल्लीतील रोहिणी येथील शासकीय रुग्णालयात नार्को चाचणी करण्यात आली. FSL चे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितले की, आफताबने नार्को टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची (Shaddha Murder) कबुली दिली आहे. एवढेच नाही तर आफताबने नार्को टेस्टमध्ये सांगितले की, त्याने श्रद्धाचा मोबाइल आणि कपडे नेमके कुठे फेकले. यासोबतच आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला आणि ते शस्त्र कुठे फेकलं हे देखील सांगितले आहे. आता दिल्ली पोलीस पुन्हा एकदा आफताबने सांगितलेल्या ठिकाणी हे पुरावे शोधणार आहेत.

Shraddha Murder: नॉनव्हेज खाण्यासाठी श्रद्धाला भाग पाडत होता आफताब, जीव वाचावा म्हणून…”

FSL चे सहायक संचालक संजीव गुप्ता काय म्हणाले?

FSL चे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. तब्बल दोन तास ही नार्को टेस्ट सुरू होती. यावेळी एक ज्येष्ठ भूलतज्ज्ञ, FSL चे एक मानसशास्त्रीय तज्ज्ञ, एक OT अटेंडेंट आणि FSL चे 2 फोटो तज्ज्ञ उपस्थित होते. आफताबच्या नार्को टेस्टनंतर एक पोस्ट FSL मध्ये होणार आहे. यामध्ये त्याचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

कोर्टात नार्को चाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही

जरी आफताबने नार्को टेस्टमध्ये श्रद्धाच्या हत्येशी संबंधित रहस्य उघड केले असले तरी ते पुरावे म्हणून न्यायालयात सादर करता येणार नाहीत. मात्र, पॉलिग्राफी आणि नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना आणखी पुरावे शोधण्यास मदत होऊ शकते. आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी श्रद्धाचा मोबाइल आणि कपडे जप्त केले तर या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळू शकतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp