Shraddha Murder: आफताबने श्रद्धाच्या नंबरवरूनच ऑर्डर केला होता फ्रिज

जाणून घ्या आफताबने नेमकं काय केलं? वाचा सविस्तर बातमी
aftab ordered fridge shraddha number vicious person using four numbers delhi police
aftab ordered fridge shraddha number vicious person using four numbers delhi police

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आफताब आणि श्रद्धाबाबत रोज नवनवे खुलासे होत आहे. आफताब पूनावाला २ मोबाइल नंबर वापरत होता अशी माहिती समोर आली होती. अशात आता हे समजतं आहे की आफताबकडे २ नाही तर ४ मोबाइल नंबर होते.

आफताबने श्रद्धाच्या मोबाइलवरून मागवला होता फ्रिज

आफताबने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे सगळे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. अशात हा फ्रिज आफताबने श्रद्धाच्या मोबाइलवरून मागवला होता. चार वेगवेगळे नंबर आफताबकडे आढळून आले आहेत. अशात आफताबने फ्रिज मागवण्यासाठी तो मोबाइल वापरला होता जो नंबर श्रद्धाच्या नावावर रजिस्टर्ड होता.

aftab ordered fridge shraddha number vicious person using four numbers delhi police
Shraddha Murder: नॉनव्हेज खाण्यासाठी श्रद्धाला भाग पाडत होता आफताब, जीव वाचावा म्हणून..."

फेसबुक लॉग इनसाठी श्रद्धा वापरत होती तोच नंबर

फेसबुकचं लॉग इन करण्यासाठी श्रद्धा वालकर हाच मोबाइल वापरत होती ज्यावरून आफताबने तिच्या हत्येनंतर फ्रिज मागवला होता. श्रद्धाचं फेसबुक अकाऊंट आणखी एका नंबरशी लिंक होतं अशीही माहिती समोर आली आहे. ज्या काही गोष्टी पोलिसांना कळल्या आहेत त्यावरून हे लक्षात आलं आहे की आफताबकडे २ पेक्षा जास्त नंबर होते. आजतककडे ही ठोस माहिती आहे की आफताबकडे ४ मोबाइल होते.

aftab ordered fridge shraddha number vicious person using four numbers delhi police
" ....तर आज श्रद्धा जिवंत असती " हत्या झालेल्या मुलीच्या आठवणीत वडील ढसाढसा रडले

श्रद्धाच्या प्रेमाचे ३५ तुकडे झाले

श्रद्धाने डोळे झाकून आफताबवर प्रेम केलं. पण आफताबने तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर रक्त येणार हे त्याला माहित होतं. मग त्याने ते केमिकलही शोधलं ज्यामुळे रक्त स्वच्छ करता येऊ शकतं. सल्फर हायपोक्लोरीक अॅसिडने त्याने रक्ताचे डाग स्वच्छ केले. हे केमिकल वापरल्याने रक्त स्वच्छ होतं आणि फॉरेन्सिकच्या तपासात त्याचे अवशेष मिळत नाहीत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने श्रद्धाचे रक्ताळलेले त्याचे आणि श्रद्धाचे कपडे काढले. हे कपडे त्याने एमसीडी कचऱ्याच्या व्हॅनमध्ये फेकले. ज्यामुळे हा पुरावा नष्ट करण्यात त्याला यश आलं.

Bumble डेटिंग अॅपवर भेटले होते श्रद्धा आणि आफताब

Bumble या डेटिंग अॅपवर श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला या दोघांची ओळख झाली होती. २०१८ मध्ये या दोघांची ओळख झाली. डेटिंग अॅपच्या माध्यमातून २०१९ ला दोघं भेटले. त्यानंतर लिव्ह इन मध्ये राहात होते. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब पूनावालाने ही कबुली दिली आहे की रक्त स्वच्छ कसं करायचं हे आफताबने गुगलवर शोधलं होतं. तसंच माणसाच्या शरीराचे तुकडे कसे करायचे हेदेखील त्याने शोधलं होतं. पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना या सगळ्याची सर्च हिस्ट्री मिळाली.

श्रद्धाच्या हत्येचं कारण आहे तरी काय?

पोलिसांनी जी माहिती या प्रकरणात दिली आहे त्यानुसार या दोघांमध्ये अलिकडे भांडणं वाढली होती. या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. आफताबला वाटत होतं की श्रद्धाच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. तर श्रद्धा हा दावा करत होती की आफताबच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं आहे. श्रद्धाच्या हत्येच्या काही महिने आधी दोघं हिलस्टेशनला गेले होते.

१८ मे २०२२ ला काय घडलं?

१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर या दोघांचा आवाज वाढला त्यावेळी श्रद्धा जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in