नुपूर शर्मांचं समर्थन केल्याने अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हेंची हत्या? वाचा सविस्तर
अमरावती (Amravati) या ठिकाणी एका व्यापाऱ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. आता यामागची एक नवी बाजू समोर आली आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केल्याने या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली अशी चर्चा सुरू झाली आहे. अमरावती शहरातल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची २१ जूनच्या रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता […]
ADVERTISEMENT

अमरावती (Amravati) या ठिकाणी एका व्यापाऱ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. आता यामागची एक नवी बाजू समोर आली आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केल्याने या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली अशी चर्चा सुरू झाली आहे. अमरावती शहरातल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची २१ जूनच्या रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? ही मागणी आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. त्यामुळेच ही चर्चा आता सुरू झाली आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणातला पेच हा आहे की या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
पोलीस अधिकारी नीलीमा आरज यांनी सांगितलं की उमेश कोल्हे हत्या प्रकरणातल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र यांचा म्होरक्या पडकला गेलेला नाही. त्यामुळे अद्याप हत्येचं कारण स्पष्ट नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. त्याला पकडण्यात आल्यानंतरच हत्येचं कारण कळू शकेल असंही त्यांनी सांगतिलं.