Dawood चं नाव घेऊन गडकरींना धमकी देणारा सापडला, तुरुंगातून केलेला कॉल

Nitin Gadkari's threatening call: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात आलेले धमकीचे फोन हे बेळगावच्या तुरुंगातून आले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
नितीन गडकरींना धमकी देणारा आरोपी सापडला
नितीन गडकरींना धमकी देणारा आरोपी सापडला(फोटो सौजन्य: Facebook)

Death Threat to Nitin Gadkari direct from Belgaum Jail: नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना त्यांच्या कार्यालयात शनिवारी आलेल्या धमकीच्या फोन कॉल (death threat call) प्रकरणात अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. तो कॉल एका सराईत गँगस्टरने केला असून तो सध्या बेळगाव तुरुंगात (Belgaum Jail) कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे. (death threat to nitin gadkari direct from jail threatening call made by accused in belgaum jail)

गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश असे असून तो हत्या प्रकरणात बेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. धमकीचा फोन बीएसएनएलच्या दूरध्वनीवरुन करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.

नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालय जवळच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी एका तासाच्या कालावधीत तीन वेळेस धमकीचे फोन कॉल आले होते. हे तीन फोन कॉल सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता या दरम्यानच्या वेळेस आले होते.

नितीन गडकरींना धमकी देणारा आरोपी सापडला
Nagpur Crime : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख अन्...

दरम्यान, या घटनेनंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्यावतीने यासंदर्भात पोलिसांत तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली होती. दाऊदचा उल्लेख करत आम्हाला खंडणी दिली नाही, तर गडकरींना जीवे मारू, असं धमकी देतना आरोपी जयशेने फोनवर म्हटलं होतं.

यासंदर्भात नागपूर पोलीस झोन 2चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माहिती देताना सांगितलेलं की. 'नितीन गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, ज्या-ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी कडक सुरक्षा असणार आहे.', असं पोलीस उपायुक्त मदाने यांनी सांगितलेलं.

नितीन गडकरींना धमकी देणारा आरोपी सापडला
राजकारण कधी सोडू अन् कधी नये असं झालंय; नितीन गडकरी यांचं मोठं विधान

दरम्यान, आता या प्रकरणातील आरोपीची माहिती समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांची एक टीम ही बेळगावच्या दिशेने रवाना झाली आहे. मात्र, तुरुंगात असणाऱ्या एका व्यक्तीकडे फोन येतोच कसा आणि त्यानंतर तो गडकरींसारख्या केंद्रीय मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी कसा देतो? यावरुन अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in