नागपुरातील प्राध्यापकांचा संतापजनक कारनामा! विद्यार्थिनींनीकडे करत होता शरीर सुखाची मागणी
नागपूरमधील सिंधी महाविद्यालयातील एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. एका प्राध्यापकाकडून अनेक विद्यार्थीनींकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात विद्यार्थींनींच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्राध्यापक सध्या फरार आहे. नागपूरमधील पाचपावली परिसरात सिंधू महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स विभागप्रमुख पदी म्हणून प्रा. राकेश गेडाम आहेत. प्रा. […]
ADVERTISEMENT

नागपूरमधील सिंधी महाविद्यालयातील एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. एका प्राध्यापकाकडून अनेक विद्यार्थीनींकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात विद्यार्थींनींच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्राध्यापक सध्या फरार आहे.
नागपूरमधील पाचपावली परिसरात सिंधू महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स विभागप्रमुख पदी म्हणून प्रा. राकेश गेडाम आहेत. प्रा. राकेश गेडाम यांच्याकडूनच विद्यार्थीनींकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
या प्रकरणात विद्यार्थींनीकडून पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. विद्यार्थींनीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी प्रा. राकेश गेडाम याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पाचपावली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपुरातील सिंधू महाविद्यालय प्रशासनाने प्रा. राकेश गेडाम याला निलंबित केलं.
Crime: डॉक्टर प्रियंकाची आत्महत्या नाही, तर डॉक्टर पतीनेच ‘यांच्या’ साथीने केली हत्या