अहमदनगरमध्ये ऑनर किलिंग, मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलाचं अपहरण आणि हत्या
मुस्लिम तरूणीशी विवाह केल्याने एका हिंदू मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या भोकर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर मुलीच्या घरातल्यांनी या मुलाचा मृतदेह नदीत फेकला. आरोपींनी ही कबुली दिल्यानंतर आता पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. अहमदनगरच्या भोकर गावात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. नेमकं […]
ADVERTISEMENT

मुस्लिम तरूणीशी विवाह केल्याने एका हिंदू मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या भोकर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर मुलीच्या घरातल्यांनी या मुलाचा मृतदेह नदीत फेकला. आरोपींनी ही कबुली दिल्यानंतर आता पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. अहमदनगरच्या भोकर गावात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
अहमदनगरमधल्या भोकर या गावात राहणाऱ्या दीपक बर्डे नावाच्या तरूणाची त्याच्याच गावात राहणाऱ्या मुस्लिम तरूणीसोबत ओळख झाली. त्यानंतर या दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एक महिन्यापूर्वी या दोघांनी लग्नही केलं. या मुलीच्या घरी जेव्हा हे कळलं की हिंदू तरूणाशी आपल्या मुलीने लग्न केलंय तेव्हा या मुलीच्या घरातल्यांनी दीपकचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली. दीपकची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी फेकला.
३१ ऑगस्ट २०२२ ला पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली होती. आरोपींची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा आरोपींनी हत्येची कबुली दिली. अहमदनगरमधल्या भोकर गावात हा ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला.