"बायको होशील का?" अल्पवयीन मुलाने वर्गातल्या मुलीला सोशल मीडियावर केलं प्रपोज, पोलिसांची कारवाई

वाचा सविस्तर बातमी काय घडलं? काय म्हटलं आहे पोलिसांनी?
In Pune A minor boy proposed to a class girl on social media, police takes action
In Pune A minor boy proposed to a class girl on social media, police takes action

माझी बायको होशील का, अल्पवयीन मुलाने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला दिले सोशल मीडिया वर लग्नाचे proposal. पोलिसांनी केली कारवाई. सोशल मीडियाचा गैरवापर याचा प्रत्यय पुण्यात आला आहे. एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने 'माझी बायको होशील का ?' असे स्टेटस इंस्टाग्रामवर त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीसाठी ठेवला. हा सगळा प्रकार घडला आहे पुण्यातील हडपसर मधे. आता हा प्रकरणामुळे या अल्पवयीन मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियाचा वापर जसा चांगला तसा वाईट सुद्धा केला जाऊ शकतो, अनेक वेळा याच सोशल मीडियावर वरून अनेक अपराध देखील घडत आहेत. असाच एक प्रकार शिक्षणाच माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून आता समोर येतोय. एका १४ वर्षीय मुलाने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला इंस्टाग्रामवरुन तिचा फोटो टाकून माझी बायको होशील का असा स्टेटसच ठेवला आणि तो व्हायरलदेखील केला. हा सगळा प्रकार जेव्हा त्या मुलीला कळाला तेव्हा तिने त्या मुलाची तक्रार आईकडे केली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. अशी माहिती अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर, पो स्टे. यांनी मुंबईतक ला दिली.

पुण्यातील हडपसर भागात एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या नाबालिक 14 वर्षीय मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही एकाच शाळेत शिकायला असल्या कारणाने यातील मुलाने अनेक वेळा त्या मुलीकडे प्रेम संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली होती. काही दिवसांपासून हा मुलगा त्या मुलीचा पाठलाग करीत असे तसेच मैत्री करण्यासाठी तिला वारंवार धमक्या द्यायचा. माझ्यासोबत प्रेमाचे संबंध मत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल अशी धमकी ही त्याने या मुलीला दिली होती. त्या मुलीने मात्र काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने तिचा फोटो घेऊन "माझी बायको होशील का" असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले. अशी तक्रार मुलीने आणि तिच्या आईने दिली आहे असे अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर, पो स्टे. यांनी सांगितले आहे.

हा सगळा प्रकार अल्पवयीन मुलाच्या बद्दल होत असल्याने पोलिसांनी पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात तक्रार झाली गुन्हा दाखल झाला पोलीस कारवाई सुद्धा करतील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in