Mira Road: ‘मी नपुंसक आहे, आणि…’, सरस्वती वैद्यची हत्या करणारा मनोज साने असं का म्हणाला?

मुंबई तक

लिव्ह-इन पार्टनर सरस्वतीची हत्या करणारा मनोज साने याने पोलिसांना दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे की, तो नपुसंक आहे आणि त्याने सरस्वतीशी कधीही लैंगिक संबंध ठेवले नव्हते.

ADVERTISEMENT

Mira road murder case Why did Manoj Sane, who killed live-in partner Saraswati vaidya, say 'I am impotent'?
Mira road murder case Why did Manoj Sane, who killed live-in partner Saraswati vaidya, say 'I am impotent'?
social share
google news

मुंबई: मीरा रोड येथे राहणाऱ्या लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या (Mira Road Murder) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या मनोज सानेबाबत (Manoj Sane) आतापर्यंत अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. आता पोलिसांच्या तपासात मनोजला सेक्सची चटक असल्याचे समोर आले आहे. तो अनेक डेटिंग अॅपवर (Dating app) मुलींच्या संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे. याच मुद्द्यावरुन सरस्वती आणि मनोजचं भांडण व्हायचं आणि याच भांडणातून मनोजने सरस्वतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. असं असताना आता मारेकरी मनोजने पोलिसांना आपल्या जबाबात सांगितलं की, त्याला एचआयव्हीची बाधा (HIV Positive) झाली असून, तो नपुंसक आहे. त्यामुळे आता पोलीस त्याच्या या दाव्याची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करणार आहेत. (mira road murder case manoj sane who killed live in partner saraswati vaidya impotent hiv positive)

प्राथमिक तपासाच्या आधारे, डेटिंग अॅप्सवरून झालेल्या भांडणातून सरस्वतीची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपी अश्लील वेबसाईटवर सक्रिय असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या माध्यमातून तो अनेक मुलींच्या संपर्कात होता. त्याच्या मोबाइलमध्ये अनेक अश्लील फोटोही सापडले आहेत.

मनोज सानेने दावा केला आहे की, सरस्वतीने आत्महत्या केली आहे. मात्र, पोलीस हे मानायला तयार नाहीत. मीरा-भाईंदर झोनचे डीसीपी जयंत भजबळे सांगतात की, मनोजनेच हत्या केली आहे. त्याने ही हत्या कशी घडवली, याचा तपास सध्या सुरू आहे.

हे ही वाचा >> मनोज सानेला होती सेक्सची चटक, म्हणून सरस्वतीला… फोनमध्ये सापडले पॉर्न Video

दरम्यान, मनोज साने हा अतिशय चाणाक्ष आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या खुनाच्या प्रकरणातून पळवाटा काढण्यासाठी तो नपुंसक असल्याचा दावा करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp