PUBG च्या नादात आईची गोळी झाडून हत्या, खुनी मुलाने अंडा करी मागवत मित्रांसोबत केली पार्टी

मुंबई तक

आईने पबजी (PUBG Game) खेळण्यापासून थांबवल्याने एका १६ वर्षांच्या मुलाने आईवर गोळी झाडून तिला ठार केलं. या अल्पवयीन मुलाला पबजी (PUBG Game) खेळण्याची सवय लागली होती. आईने त्याला PUBG खेळ खेळण्यापासून रोखत असे. मात्र आता ही घटना समोर आली आहे. या घटनेत या मुलाने त्याच्या आईच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर अंडा करी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आईने पबजी (PUBG Game) खेळण्यापासून थांबवल्याने एका १६ वर्षांच्या मुलाने आईवर गोळी झाडून तिला ठार केलं. या अल्पवयीन मुलाला पबजी (PUBG Game) खेळण्याची सवय लागली होती. आईने त्याला PUBG खेळ खेळण्यापासून रोखत असे. मात्र आता ही घटना समोर आली आहे. या घटनेत या मुलाने त्याच्या आईच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर अंडा करी मागवत मित्रांसोबत पार्टीही केली.

दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या राग, बेडरुममध्ये घुसून
प्रेयसीची हत्या; प्रियकराने स्वत:लाही संपवलं!

उत्तर प्रदेशातल्या लखनऊमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश मधल्या लखनऊ शहरातल्या पीआयजी भागात हा १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा राहतो. त्याने आई पबजी (PUBG Game) खेळण्यापासून रोखते म्हणून तिला गोळी घालून ठार केलं. त्यानंतर मित्रांना बोलावलं ऑनलाईन अंडा करी मागवली आणि पार्टीही केली. मित्रांनी जेव्हा त्याला विचारलं की आई कुठे आहे? तर त्याने सांगितलं की ती काका-काकूंच्या घरी गेली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp