काय आहे डिजिटल रेप? नोएडातल्या ८१ वर्षांच्या वृद्धावर नेमका आरोप काय?

मुंबई तक

दिल्लीतल्या नोएडा भागात लैंगिक शोषणाचं एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. त्यानंतर चर्चेत आहे डिजिटल रेप. या प्रकरणी २०१३ च्या Criminal Law मध्ये सुधारणा ( amendment ) करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) मध्ये समावेश करण्यात आला आहे. याला निर्भया अधिनियम असंही म्हटलं जातं. आपण जाणून घेऊ काय आहे डिजिटल रेपचा अर्थ? […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

दिल्लीतल्या नोएडा भागात लैंगिक शोषणाचं एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. त्यानंतर चर्चेत आहे डिजिटल रेप. या प्रकरणी २०१३ च्या Criminal Law मध्ये सुधारणा ( amendment ) करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) मध्ये समावेश करण्यात आला आहे. याला निर्भया अधिनियम असंही म्हटलं जातं. आपण जाणून घेऊ काय आहे डिजिटल रेपचा अर्थ?

डिजिटल रेपचा अर्थ काय?

नोएडा पोलिसांनी सांगितल्यानुसार डिजिटल रेपचा अर्थ हा नाही की एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं शोषण इंटरनेटच्या माध्यमातून केलं जावं. हा शब्द डिजिट आणि रेप या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. इंग्रजीत डिजिटचा अर्थ अंक असा असतो. इंग्रजी शब्दकोशात बोटं, अंगठा, पायाची बोटं या सगळ्यांनाही डिजिट असं म्हटलं जातं. माहिती तज्ज्ञांच्या मते डिजिटल रेपशी संबंधित घटनांमध्ये महिलांच्या प्रायव्हेट पार्टचं शोषण केलं जातं.

हे वाचलं का?

    follow whatsapp