Pune MPSC: दर्शना पवारची राहुलने केली दगडाने ठेचून हत्या?, धक्कादायक माहिती समोर
पुण्यात झालेल्या दर्शना पवारच्या हत्ये प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. राहुल हांडोरेने दर्शनाची दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT

Darshana Pawar Murder: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्येने राज्यात खळबळ माजली. याच प्रकरणातील तिचा आरोपी राहुल हांडोरेच्या (Rahul Handore) अटकेनंतर नवनवे खुलासे होत आहे. आतापर्यंत दर्शनाची हत्या (Murder)नेमकी कशी झाली होती हे समोर आलं नव्हतं. मात्र याबाबतची काही महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. राहुलने स्वत: कबूल केलं आहे की, त्यानेच दर्शनाची हत्या केली. पण ही हत्या त्याने कशी केली याबाबत पोलिसांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. (pune mpsc darshana pawar murder accused rahul handore stone sharp weapon police investigation Shocking information crime news)
दर्शना आणि राहुल यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच होती. दर्शना पवारचे वडील हे कोपरगावमधील साखर कारखान्यातील एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात तर राहुल हांडोरेचे वडील नाशिकमध्ये पेपर स्टॉल चालवतात.
राहुल हांडोरेने हा विज्ञान शाखेतून पदवीधर झाला आहे. तसंच तो मागील काही दिवसांपासून MPSC परीक्षेची देखील तयारी करत होता. पण याचवेळी तो त्याच्या शिक्षण आणि राहण्याचा खर्च भागावा म्हणून तो ऑनलाइन फूड डिलिव्हरीचं कामंही करायचा.
हे ही वाचा >> Pune, MPSC: राहुलसोबत लग्नाला नकार, दर्शना पवारच्या कुटुंबीयांनी नव्हे तर…
दर्शना आणि राहुल हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यांनी MPSC परीक्षेची तयारी देखील एकत्रच सुरू केली होती. मूळातच हुशार असलेल्या दर्शनाने पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा पास केली. एवढंच नव्हे तर तिने राज्यात तिसरा येण्याचा मान देखील पटकावला. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची नेमणूक देखील झाली होती. मात्र अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारण्याआधीच राहुलने तिची निर्घृण हत्या केली.









