ट्रिपल मर्डरने सातारा हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयावरुन महिलेचा खून, दोन मुलांनाही संपवलं
सातारा: कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथील 38 वर्षीय महिलेचा गळा दाबून आणि दोन मुलांचा विहीरीत ढकलून खून करण्यात आला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराकडून गळा दाबून खून करण्यात आल्याती माहिती समोर आली आहे. या खळबळजनक घटनेने कोरेगाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
महिलेच्या खूनाबरोबरच दोन मुलांना विहिरीत ढकलून त्यांचाही खून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत रहिमतपूर पोलिस स्थानकामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. आरोपी दत्ता राहणार राजे बोरगाव ता. जि. उस्मानाबाद सध्या राहणार वेलंग शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास रहिमतपुर पोलीस करत आहेत.
रहिमतपूरचे पोलीस उपनिरिक्षक प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनूसार कोरेगाव तालुक्यातील राजेंद्र भिकु गायकवाड यांच्या घरात भाड्याने राहण्यास असणा-या दत्ता याच्या सोबत संबंधित महिला राहत होती. तिचा घातपात झाल्याचा संशय घटनास्थळी गेलेल्या पोलीसांना आला. त्यामुळे पोलीसांनी दत्ताची कसून परिसरात चौकशी केली असता तो गावात दिसला नसल्याची माहिती समोर आली. तो मूळचा राजेबोरगाव येथे असल्याचे पोलीसांना समजले. महिला दत्ता सोबत राहत होती. दत्ता याने महिलेचच्या दोन मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची माहितीही सावंत यांनी दिली आहे.