सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग, का करण्यात आली हत्या?
Sidhu Moose Wala Death : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवालावर एएन ९५ रशियन रायफलने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शींनीही महत्त्वाची माहिती दिलीये. रविवारी सायंकाळी पंजाब हादरला. सुरक्षा काढून घेण्यात आलेल्या सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून […]
ADVERTISEMENT

Sidhu Moose Wala Death : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवालावर एएन ९५ रशियन रायफलने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शींनीही महत्त्वाची माहिती दिलीये.
रविवारी सायंकाळी पंजाब हादरला. सुरक्षा काढून घेण्यात आलेल्या सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील गँगवॉरमध्ये पहिल्यांदाच एएन-९४ चा वापर करण्यात आला आहे. जवळपास ८ ते १० जणांनी हा हल्ला केला होता, अशीही माहिती समोर आलीये.
सिद्धू मुसेवालाची हत्या झाली, त्यावेळी तिथे असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने घटनाक्रम सांगितला. याच प्रत्यक्षदर्शीने सिद्धू मुसेवालाला गाडीतून बाहेर काढलं होतं. मेसी नाव असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दावा केलाय की, ज्यावेळी सिद्धू मुसेवालाला गाडीतून बाहेर काढलं. त्यावेळी तो जिवंत होता.
‘आजतक’शी बोलताना मेसी म्हणाला, ‘जेव्हा हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवालावर गोळीबार केला. त्यावेळी सर्वात आधी मीच घटनास्थळी पोहोचलो होतो. मुसेवालासोबत आणखी दोन व्यक्ती होत्या. ते लोक गाडीत बसलेले होते.’