‘मैं खुश नहीं हूं’; मुंबईत मॉडेलनं मृत्यूला मारली मिठी; पोलिसांना मिळाली ‘सुसाईड नोट’
मायानगरी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल असं नाही. ही चंदेरी नगरी अनेकांना यशाच्या शिखरावर पोहोचवते, तर अनेक खस्ता खावूनही अनेकांच्या पदरी निराशाच येते. अपयशातून येणाऱ्या नैराश्यातून अनेक जण मृत्यूला कवटळतात. अशीच एक घटना चंदेरी दुनियेत घडलीये. मुंबईत एका मॉडेलने हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीये. मुंबईतल्या अंधेरी भागात मॉडेलनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी […]
ADVERTISEMENT
मायानगरी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल असं नाही. ही चंदेरी नगरी अनेकांना यशाच्या शिखरावर पोहोचवते, तर अनेक खस्ता खावूनही अनेकांच्या पदरी निराशाच येते. अपयशातून येणाऱ्या नैराश्यातून अनेक जण मृत्यूला कवटळतात. अशीच एक घटना चंदेरी दुनियेत घडलीये. मुंबईत एका मॉडेलने हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीये.
ADVERTISEMENT
मुंबईतल्या अंधेरी भागात मॉडेलनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली. आत्महत्या करण्यापूर्वी या मॉडेलनं सुसाईड नोटही लिहिली होती. ही सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. यात मॉडेलनं आत्महत्येचं कारण सांगितलं आहे.
मुंबईतल्या अंधेरीत मॉडेलनं का केली आत्महत्या?
मिळालेल्या माहितीप्रमाणे ३० वर्षीय मॉडेल मुंबईतल्या अंधेरी भागात असलेल्या चार बंगला स्थित एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. या मॉडेलने हॉटेलच्या रुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय.
हे वाचलं का?
आत्महत्या केलेल्या मॉडेलचं नाव आकांक्षा मोहन असल्याचं सांगण्यात आलंय. ती लोखंडवालातल्या यमुना नगर सोसायटीमध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बुधवारी दुपारी १ वाजता मॉडेलने हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. त्यानंतर रात्री जेवणाची ऑर्डर दिली होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (२९ सप्टेंबर) मॉडेलनं आत्महत्या केल्याचं समोर आलं. हॉटेलमधील वेटरने सकाळी आकांक्षा मोहन राहत असलेल्या रुमचा दरवाजा वाजवला. त्यानंतर आवाजही दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वेटरने याबद्दल हॉटेलच्य मॅनेजरला सांगितलं.
ADVERTISEMENT
हॉटेलच्या मॅनेजरने याबद्दलची माहिती फोन करून पोलिसांना दिली. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मॉडेलच्या रुमचा दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर आता गेलेल्या पोलिसांना धक्काच बसला. मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकेल्या अवस्थेत होता.
ADVERTISEMENT
मॉडेलने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?
पोलिसांनी मॉडेल राहत असलेल्या रुमची झाडाझडती घेतली. यावेळी एक सुसाईड मिळाली. या सुसाईड नोटमध्ये मॉडेल आकांक्षा मोहनने म्हटलं आहे की, ‘मला माफ करा. यासाठी कुणीही जबाबदार नाहीये. कुणालाही त्रास देऊ नका. आनंदी नाहीये. मला फक्त शांतता हवीये.’
वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत या प्रकरणाची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. मॉडेलने आनंदी नसल्यानं आत्महत्या केलं असल्याचं म्हटलेलं असलं, तरी पोलीस इतर अंगानेही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT