Sakinaka Crime: मुंबई हादरली, आधी दोघं रिक्षात बसले.. नंतर तरुणीचा गळाच चिरला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

A shocking incident has taken place in Mumbai's Sakinaka area where a young man brutally murdered a 30-year-old woman
A shocking incident has taken place in Mumbai's Sakinaka area where a young man brutally murdered a 30-year-old woman
social share
google news

मुंबई: मुंबईतील (Mumbai) साकीनाका (Sakinaka) पोलीस स्टेशनच्या हद्दीत खैरानी रोड येथील दत्तनगर परिसरात भर रस्त्यात एका तरुणाने 30 वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून हत्या (Murder) केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर तरुणाने देखील स्वतःवर केले चाकूने वार केले. ज्यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला असल्याचं समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करत आहेत. (30 year old woman allegedly murdered boyfriend inside autorickshaw khairani road saki naka area mumbai crime news)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका परिसरात 30 वर्षीय तरुणाने कथित गर्लफ्रेंडची रिक्षातच हत्या केली. सुरुवातीला एका रिक्षातूनच आरोपी तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यामध्ये एका मुद्द्यावरून वाद झाला. ज्यानंतर अचानक तरुणाने चाकूने तरुणीचा गळाच चिरला. ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. त्याच अवस्थेत तरुणी रिक्षातून बाहेर निघाली. मात्र, तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.

हे ही वाचा >> सरस्वती वैद्यच्या हत्येचं गूढ उकललं, ‘या’ पदार्थात कीटकनाशक मिसळून हत्या

यावेळी रिक्षा चालकावर देखील रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. अचानक झालेल्या या घटनेने रिक्षाचालक देखील भयभीत झाला. दुसरीकडे आरोपी तरुणाने स्वत:वर देखील चाकून वार करुन स्वत:ला जखमी करून घेतलं. दिवसाढवळ्या तरुणीची भररस्त्यात करण्यात आलेल्या या हत्येमुळे साकीनाका परिसरात एकच खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

तरुणीची हत्या नेमकी का करण्यात आली आणि दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावरुन वाद सुरू होता याचा सध्या साकीनाका पोलीस तपास करत आहेत.

हे ही वाचा >> Crime : अरे देवाSS! बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेने घेतला गळफास, कारण…

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

‘साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. हि अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपासयंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे.’ असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT