Nagpur: सिगारेटचा धूर चेहऱ्यावर उडवला, तरुणीने विरोध करणाऱ्या तरुणाचा काढला काटा!

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagpur Crime News : नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिगारेट ओढत असताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणीने आपल्या मित्रांसह एका तरुणाची चक्क हत्या केली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओही समोर आला असून, त्याआधारे पोलिसांनी याप्रकरणी दोन मुलींसह चार आरोपी तरूणांना अटक केली आहे. (a woman cigarette smoke blew on the young man's face as soon as there agrument happend She killed him on the street along with his friends)

नागपुरातील मानेवाडा संकुलात ही घटना घडली. या संकुलातील पान स्टॉलवर तरुणीने तिच्या साथीदारासह हा खून केला. रणजीत राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. खरंतर रणजीत कपडे विकण्याचा व्यवसाय करायचा. तो अनेकदा पान स्टॉलवर सिगारेट ओढायला यायचा.

का करण्यात आली रणजीतची हत्या? नेमका वाद काय?

शनिवारी (6 मार्च) रात्री जयश्री नावाची तरूणी सिगारेट ओढत असताना रणजीतही येथे उपस्थित होता. सिगारेट ओढत असताना जयश्रीने धूर रणजीतच्या तोंडाकडे उडवला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की जयश्रीने तिच्या साथीदारांसह रणजीतची हत्या केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे केली अटक

मृताच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी जयश्री पानझरे, यशवंत सायरे, आकाश राऊत आणि सविता यांना अटक केली आहे. या व्हिडीओमध्ये जयश्री रणजीतला शिवीगाळ करत होती, त्यानंतर रणजीतने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला होता. त्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात जयश्रीची नागपूरच्या काही गुंड आणि बदमाशांशी मैत्री असल्याचेही समोर आले आहे.

  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT