मावशीसोबतच तरुणाचे प्रेमसंबंध... अखेर, मंदिरात उरकलं लग्न! अनोखं प्रेम प्रकरण चर्चेत...

मुंबई तक

एका तरुणाने सामाजिक भान न ठेवता आपल्या मावशीसोबतच मंदिरात जाऊन लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

मावशीसोबत मंदिरात उरकलं लग्न...
मावशीसोबत मंदिरात उरकलं लग्न...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मावशीसोबतच तरुणाचे प्रेमसंबंध...

point

मंदिरात मावशीसोबत केलं लग्न अन्...

point

अनोख प्रेम प्रकरण चर्चेत

Crime News: उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे एका अनोख्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. एका तरुणाने  सामाजिक भान न ठेवता आपल्या मावशीसोबतच मंदिरात जाऊन लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण कौशांबीच्या मोहब्बतपूर पइंसा पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

मावशीसोबतच तरुणाचे प्रेमसंबंध 

जगन्नाथपूर येथील रहिवासी असलेल्या कृष्णा कुमार नावाच्या 24 वर्षीय तरुणाचे संजना देवी या 23 वर्षीय तरुणीसोबत मागील वर्षांपासून प्रेमसंबंध होते. खरं तर, या दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. मात्र, संजना ही नात्याने कृष्णाची मावशी लागत असल्याकारणाने कुटुंबियांना या लग्नाला पूर्णपणे विरोध होता. कुटुंबियांकडून प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे दोघेही अतिशय दु:खी होते. यासाठी त्यांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. 

हे ही वाचा: मुंबई: पालकांनो सावधान! प्रतिष्ठित शाळेत अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक... ट्रॅफिक हवालदार निलंबित!

दोन्ही पक्षांनी लग्नाला होकार दिला अन्... 

दरम्यान, संजनाने मोहब्बतपूर पइंसा पोलीस स्टेशन परिसरातील उदिहीन खुर्द पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना (कृष्णा आणि संजनाच्या कुटुंबियांना) पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. पोलिसांनी दोन्ही पक्षातील कुटुंबियांना समजावून सांगितलं आणि त्यांना कृष्णा आणि संजनाच्या लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी समजावल्यानंतर, अखेर दोन्ही पक्षांनी लग्नाला सहमती दर्शवली. 

हे ही वाचा: 'तुझ्या मुलांपेक्षा जास्त सुंदर तर...', एका टोमण्याने पूनम बनली सायको किलर; चार निष्पाप चिमुरड्यांना पाण्याच्या टाकीत...

दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी लग्नाला होकार देताच, पोलीस स्टेशनजवळील भगवान शिव मंदिरात लग्नाची तयारी सुरू करण्यात आली. संजना आणि कृष्ण यांनी एकमेकांना हार घालून आणि संजनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालून लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या. या प्रसंगी डीजे आणि इतर वाद्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. या जोडप्याने मंदिरात एकत्र नवस फेडले आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आशीर्वाद घेतले. या लग्न समारंभात दोन्ही कुटुंबियांचे लोक उपस्थित होते. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp