'तुझ्या मुलांपेक्षा जास्त सुंदर तर...', एका टोमण्याने पूनम बनली सायको किलर; चार निष्पाप चिमुरड्यांना पाण्याच्या टाकीत...
Crime News : तिने ज्या चार मुलांना मारलं त्यात तिचा स्वतःचा तीन वर्षांचा मुलगाही होता. पोलिसांनी सांगितलं की, संशय आपल्यावर येऊ नये म्हणून तिने मुलींबरोबरच स्वतःच्या मुलालाही मारलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'तुझ्या मुलांपेक्षा जास्त सुंदर तर...', एका टोमण्याने पूनम बनली सायको किलर;
चार निष्पाप चिमुरड्यांसोबत भयंकर घडलं
Crime News : हरियाणातील पानीपत आणि सोनीपत या दोन जिल्ह्यांत झालेल्या चार चिमुकल्यांच्या सलग हत्यांनी संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. वर्षानुवर्षे ‘अपघात’ म्हणून समजल्या गेलेल्या या मृत्युंच्या मागे एक थरकाप उडवणारा सत्य दडलेलं असल्याचं पोलिस तपासात उघड झालं. या सर्व हत्या एकाच महिलेने म्हणजेच 32 वर्षीय पूनमने केवळ सुंदर मुलांबद्दलच्या मत्सरातून केल्याचं उघड झालं आहे.
‘सुंदर मुलांबद्दल मत्सर, म्हणून हत्या’ , पोलिसांपुढे कबुली
पानीपत पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीत पूनमने धक्कादायक कबुलीजबाब दिला. तिच्या मते तिला विशेषतः मुलींच्या सौंदर्यामुळे प्रचंड हेवा वाटायचा. आश्चर्याची बाब म्हणजे, तिने ज्या चार मुलांना मारलं त्यात तिचा स्वतःचा तीन वर्षांचा मुलगाही होता. पोलिसांनी सांगितलं की, संशय आपल्यावर येऊ नये म्हणून तिने मुलींबरोबरच स्वतःच्या मुलालाही मारलं.
पूनमने हत्या करण्यासाठी घरातील पाण्याच्या टाक्यांचा वापर केला. पाणी हेच सर्वात सोपं आणि निःशब्द माध्यम असल्याचं तिला वाटायचं. बळी पूर्णपणे बुडला आहे याची खात्री करण्यासाठी ती बारीक लक्ष ठेवत असे, ज्यामुळे मृत्यू निश्चित होई.
सासरच्या बाजूने दुसरीच स्टोरी
सोनीपत येथील सासरवाडी मात्र चौकशीत वेगळी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार पूनम अनेकदा आपला आवाज बदलून एखाद्या पुरुष आत्म्याने आपल्यात प्रवेश केल्याचा दावा करत असे. “मी तीन मुलांना मारलंय” असं ती कधी कधी सांगत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय पूनमचा संपर्क उत्तर प्रदेशातील कैरान्यातील एका तांत्रिकाशीही असल्याचं तपासात समोर आलं.










